अकोले: दोन गटात तुंबळ राडा, १५ जणांवर गुन्हा दाखल

अकोले: दोन गटात तुंबळ राडा, १५ जणांवर गुन्हा दाखल
Published on
Updated on

अकोले, पुढारी वृत्तसेवा : अकोले तालुक्यातील देवठाण येथील ढोकरी फाटा येथे दोन गटात तुंबळ राडा झाला होता. या प्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या असून दोनही गटातील १५ जणांवर मारहाणीसह दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुहास भाऊसाहेब पुंडे (वय २७, रा. ढोकरी ) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. आरोपी ऋषिकेश उत्तम देशमुख (रा. सुगाव बुद्रुक), सचिन किसन सदगीर (रा. पिंपळगाव नाक्विंदा), अनिल बाळासाहेब पवार (रा. सुगाव), सागर देशमुख (रा. इंदोरी), राहुल जाधव (रा. चितळवेढे), जगन वसंत देशमुख (रा. इंदोरी), जावेद जहागीरदार (रा. अकोले), अजित येवले (रा.मेहदुरी), रवी आहेर (रा. पिंपळगाव कुंजीरा) आणि इतर पाच ते सहा अनोळखी व्यक्तींनी संगनमत फिर्यादीला लोखंडी कडे, टॉमी चाकू तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केली. यावरून अकोले पोलिसांनी कलम ३२४, ३२३, ५०४, १४१, १४३, १४७, १४८, १४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच या सागर विजय देशमुख (रा. इंदोरी) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, माझ्या खडी क्रशरच्या डंपरवरील चालक गोकुळ उत्तम पिचड यास आरोपी सुहास भाऊसाहेब पुंडे, सागर भाऊसाहेब पुंडे, भाऊसाहेब पुंडे (रा. ढोकरी), कमलेश डेरे (रा. डेरेवाडी ता. संगमनेर), शुभम चव्हाण (रा. गुरवझाप), अतुल बाळासाहेब देशमुख (रा. सुगाव), अण्णासाहेब सुधाकर वाकचौरे (रा. कळस ता. अकोले) यांनी आमच्याकडे काम कर नाही तर, तुला डंपर चालवु देणार नाही असे म्हणुन त्यास लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी फिर्यादी सागर देशमुख व साक्षीदार हे सोडविण्यासाठी गेले असता, आरोपी सुहास भाऊसाहेब पुंडे याने हातातील लाकडी दांडयाने फिर्यादीच्या हातावर मारुन दुखापत केली. या फिर्यादीवरुन कलम ३२४,३२३,५०४,५०६,१४१,१४३,१४७,१४८,१४९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि.मिथुन घुगे करित आहे.

या गुन्ह्यात सुहास पुंडे या फिर्यादीने मला बंदुकीचा धाक दाखवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे म्हटले होते. मात्र अकोले पोलीस ठाण्याचे स.पो.नि. मिथुन घुगे यांनी या घटनेचा इन्कार करीत कुठेही बंदूक वापरली नसल्याचे दैनिक पुढारीला सांगितले. अकोले पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news