काश्मीरमध्ये दोन वर्षांत सिनेमा चित्रीकरण ७ पट!

काश्मीरमध्ये दोन वर्षांत सिनेमा चित्रीकरण ७ पट!
Published on
Updated on

श्रीनगर; वृत्तसंस्था : बॉलीवूड असो की टॉलीवूड, 1980 च्या दशकात काश्मीर हेच प्रमुख शूटिंग लोकेशन असायचे. नंतर दहशतवाद फोफावला आणि हे सारे मागे पडले. आता केंद्र सरकारने 370 कलम हटविल्यानंतर तेच दिवस पूर्ववत परतले आहेत.

काश्मीरच्या खोर्‍यात पुन्हा 'अ‍ॅक्शन, कॅमेरा, कट' असे ध्वनी सुखेनैव निनादत आहेत. गेल्या तीन वर्षांत चित्रपट, वेबसीरिज मिळून शूटिंगसाठी काश्मीरकरिता विक्रमी 700 अर्ज आले. त्यापैकी 375 चित्रीकरणे सुरू झाली आहेत. उर्वरितही लवकरच सुरू होतील.

आकडे बोलतात…

2022 मध्ये 127 अर्ज आले होते. त्यातील 100 चित्रपटांचे चित्रीकरण पूर्ण झाले.
2023 मध्ये 350 हून अधिक अर्ज आले आणि केवळ 105 चित्रपट प्रत्यक्षात जमिनीवर उतरू शकले.
2024 मध्ये आलेल्या अर्जांची संख्या 2022 च्या तुलनेत 7 पटींनी जास्त आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news