FIFA World Cup : प्रेक्षकांना राहण्यासाठी तंबू उभारणार

FIFA World Cup : प्रेक्षकांना राहण्यासाठी तंबू उभारणार
Published on
Updated on

दोहा ; वृत्तसंस्था : फिफा वर्ल्डकप 2022 (FIFA World Cup) हा अगदी तोंडावर आला आहे. येत्या 21 नोव्हेंबरपासून 18 डिसेंबर 2022 पर्यंत ही स्पर्धा कतार देशात खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेत एकूण 32 सामने होणार असून त्यासाठी पाच शहरांतील स्टेडियम सज्ज झाली आहेत. यामध्ये राजधानी दोहासह लुसैल, अल खोर, अल रेयान आणि अल वकराह या शहरांचा समावेश आहे. या स्पर्धेसाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली असली तरी स्पर्धेदरम्यान येणार्‍या प्रेक्षकांची निवास व्यवस्था अपुरी पडण्याची शक्यता आहे आणि त्यासाठी पर्याय म्हणून तंबू उभारण्याची सरकारची योजना आहे.

वर्ल्डकपचे यजमानपद भुषवणारा कतार हा मध्यपूर्वेतील पहिला देश बनला आहे. कतारची लोकसंख्या अवघी 28 लाख आहे. या देशाला फुटबॉलचा फारसा इतिहास नाही, तरीही पेट्रो डॉलर्सच्या जोरावर त्यांनी हे शिवधनुष्य उचलले आहे. स्पर्धा काळात येथे 12 लाखांहून जास्त परदेशी लोक येथे प्रवास करतील, असे अनुमान आहे. यातील एक लाख लोकांना हॉटेलमध्ये रूम उपलब्ध होऊ शकते. ही निवास व्यवस्था अपुरी पडू शकते, असे संयोजकांना वाटते. सध्या 30 हजार रूम या खेळाडू, रेफरी, पदाधिकारी आणि मीडियासाठी बुक आहेत. त्यामुळे परदेशी प्रेक्षकांना राहण्यासाठी तंबू उभारण्याचा कतार पर्यटन विभाग विचार करीत आहे. जवळपास 1000 तंबू उभारून त्याला 'फॅन व्हिलेज' असे नाव देण्यात येणार आहे. (FIFA World Cup)

कतार हा वाळवंटी देश असल्याने उष्णता असलेला प्रदेश म्हणून ओळखला जातो. 15 हजार रुपये भाडे असलेल्या या केबीनमध्ये पाणी आणि लाईटची व्यवस्था असेल; परंतु एअर कंडिशनिंग (एसी) मात्र नसणार आहे. स्पर्धा काळात तापमान 30 डिग्री सेल्सिअसपर्यंत जाऊ शकते. हे युरोपियन देशातील नागरिकांना त्रासदायक ठरू शकते. याशिवाय स्थानिक नागरिकांना आपल्या घरांमध्ये पर्यटकांना भाडेतत्त्वावर राहू देण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे. कतार एअरवेजही या कामात सरकारला मदत करण्यास पुढे आले असून प्रेक्षकांनी आसपासच्या देशात राहावे, त्यांच्यासाठी शटल फ्लाईटची व्यवस्था करण्यात येणार आहे. याशिवाय दोहाच्या समुद्रात उभ्या असलेल्या क्रूजवरही प्रेक्षकांना निवासाची व्यवस्था होऊ शकते.

* कतारची लोकसंख्या अवघी 28 लाख
* स्पर्धा काळात 12 लाखांहून जास्त परदेशी लोकांचे आगमन
* 1 लाख लोकांना हॉटेलमध्ये रूम उपलब्ध
* 1000 तंबू उभारून 'फॅन व्हिलेज' असे नाव
* 15 हजार रुपये भाडे असलेल्या या केबीनमध्ये पाणी आणि लाईटची व्यवस्था
* स्थानिक नागरिकांना आपल्या घरांमध्ये पर्यटकांना भाडेतत्त्वावर राहू देण्यास प्रवृत्त

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news