Paytm Recharge : पेटीएम रिचार्ज होणार महाग, यूजर्सकडून आकारले जाणार अतिरिक्त शुल्क | पुढारी

Paytm Recharge : पेटीएम रिचार्ज होणार महाग, यूजर्सकडून आकारले जाणार अतिरिक्त शुल्क

पुढारी ऑनलाईन डेस्क : 

पेमेंटसाठी पॉप्युलर असलेल्या Paytm ॲपने आपल्या ग्राहकांना धक्का दिला आहे. आता paytm App वरून मोबाईल रिचार्ज केल्यास, यावर अतिरिक्त शुल्क आकारला जाणार आहे. हे अतिरिक्त शुल्क १ ते ६ रुपयां दरम्यान असू शकते. जो आपल्या रिजार्जच्या रकमेवर अवलंबून असणार आहे. एका वृत्तवाहिनीच्या रिपोर्टनुसार, जरी UPI किंवा बँक क्रेडिट/डेबिट कार्डद्वारे केलेल्या सर्वप्रकारच्या रिचार्जवर, अधिकचे शुल्क आकारले जाणार आहे.

सध्या, हे अपडेट सर्व वापरकर्त्यांसाठी लागू केले गेलेले नाही. एका वृत्तवाहिनीने दिलेल्या अवहालात म्‍हटलं आहे की, अद्याप हे अपडेट सर्वच यूजर्ससाठी लागू करण्यात आले नसले तरी, मार्चच्या सुरूवातीला काही Paytm वापरकर्त्यांकडून १०० रुपये आणि त्यापुढील केलेल्या व्यवहारांवर काही प्रमाणात शुल्क आकारण्यात आला आहे.

यापूर्वी २०१९ मध्ये Paytm ने वापरकर्त्यांना स्‍पष्‍ट केले होते की, ते कोणत्याही पेमेंट पद्धती, सुविधा किंवा व्यवहारांवर वापरकर्त्यांकडून कोणत्याही प्रकारे शुल्क आकारणार नाही. परंतु सध्या महसूल उत्पन्न वाढविण्याच्या दृष्टीने कंपनीने आपल्‍या धोरणात बदल केला आहे.

Paytm चा प्रतिस्पर्धी असलेल्या PhonePe ने देखील मागील वर्षी ऑक्टोबरमध्ये ५० रुपयांपेक्षा जास्त रूपयांच्या मोबाईल रिचार्जवर वापरकर्त्यांकडून ‘प्रोसेसिंग फी’ आकारण्यास सुरुवात केली होती. कंपनीने ज्याचा परिणाम शेकडो वापरकर्त्यांवर झाला आणि त्यांनी सोशल मीडियावर PhonePe विषयी नाराजी व्यक्त केली. असेच काही Paytm बाबतीत घडताना दिसत आहे. याप्रकरणी सोशल मिडियावर अनेक यूजर्सकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

Back to top button