जागतिक पर्यावरण दिन : पर्यावरणाचा समतोल बिघडतोय? स्वतःपासून बदलाची सुरुवात…

World  Environment Day 
World  Environment Day 

[author title="सोनाली जाधव" image="http://"][/author]

असह्य उन्हाच्या झळा बसायला लागल्या की झाडांची आठवण येते आणि तापमान वाढल्याची जाणीव होते, पाऊस पडला नाही आणि दुष्काळजन्यस्थिती निर्माण झाली की पाऊस पडायला पाहिजे रे असं सहज बोलून जातो, भुसख्लन होवून गावच्या गावे जमिनिखाली गाडली गेली, शेतजमिनी नष्ट झाल्या की कळवळून जातो, महापूर आला की निसर्ग कोपला म्हणून बऱ्याचवेळा विषय सोडून देतो. पण या गोष्टी वारंवार घडत असताना पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे का? हा कृतीशील विचार आपण कितपत करतो? आपण छोट्या-छोट्या कृतीतुनही निसर्गाचा समतोल राखू शकतो. आज जागतिक पर्यावरण दिन. त्या निमित्ताने पाहूया आपण पर्यावरण संवर्धनासाठी काय  करु शकतो. World  Environment Day 

पर्यावरणाचा समतोल बिघडतोय? 

  • गेल्या काही वर्षांपासून मानवी अविविके कृतीमुळे पर्यावरणाचे संतुलन ढासळत आहे
  • याचा परिणाम मानवी जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष होत आहे
  • पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी आपण छोट्या-छोट्या कृती करु शकतो

'निसर्ग माणसाची गरज भागवतो, हाव नाही' हे वाक्य तुम्ही वाचलं असेल किंवा ऐकलही असेल. पण तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल आपण निसर्गाचा वापर अविवेकीपणे, हव्यासापोटी बऱ्याचवेळा करत असतो. परिणामी पर्यावरणाचा समतोल दिवसेंदिवस बिघडत आहे आणि याचे परिणाम आपण प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे भोगत आहोत. काही लोकांशी 'पर्यावरण आणि आपण' यावर संवाद साधला तेव्हा ते काय म्हणाले ते आपण मुद्द्यांच्या आधारे पाहू…

R3 पर्यावरणपुरक शैलीचे सूत्र वापरा

माणसाने आपल्याला गरज लागेल तेव्हाच वस्तुंचा वापर करणं गरजेचे बनले आहे. जेणेकरुन नैसर्गिक संसाधनांचा वापर कमी केला जाईल.  R3 (Reduce, Reuse, Recycle) म्हणजे 'कमी वापरा, पुन्हा वापरा, पुनर्निर्मिती करा' या जीवनशैलीच सुत्र वापरात आणले तर नक्कीच पर्यावरणाचा समतोल संतुलित ठेवण्यास मद होईल. यावर बोलताना
 वर्षा वायचळ म्हणतात, " ग्लोबल वार्मिंग एक कटू सत्य आहे, लोक एक फिल्मी मायावी जगात जगत आहेत, पृथ्वीचे तापमान वाढत आहे याची जाणीव होणे गरजेचे आहे. लोकांनी झाडे लावली पाहिजेत, जास्तीत जास्त लोकल ट्रान्सपोर्ट वापरला पाहिजे. प्रत्येक वस्तू खरेदी करताना १०० वेळा विचार करावा ती वस्तू उपयुक्त आहे का? ती रिसायकल होते का? वस्तूंचा कमीत कमी वापर करावा, जुन्या वस्तू परत परत वापराव्या, जसे की  बूट फाटला की फेकू नये तो शिवून परत वापरावा, जुने कपडे रिसायकल होतात का पहावे. कोणतीही वस्तू खरेदी करतो म्हणजे त्याची निर्मिती करण्यासाठी होणारा कार्बन प्रचंड प्रमाणात असतो आणि हाच आपल्याला टाळला पाहिजे.

बाबांच्या आठवणी या झाडांच्या रुपात कायम राहतील…

रॅपर, संशोधक विद्यार्थी असलेला अनिकेत विश्रांती मच्छिंद्र सांगतो, "वडिलांच वयाच्या ५२ व्या वर्षी निधन झालं, त्यांना जगायची खूप इच्छा होती पण आजारपणामुळे सगळं काही अधुर राहिलं. त्यांच्या आठवणी चिरकाल जपाव्या म्हणून आम्ही ५२ झाडे लावण्याचे ठरवलं.  त्यामध्ये  विविध प्रकारच्या देशी झाडांची आम्ही लावण केली. त्यांनंतर चिंचेच्या असंख्य बिया जागा मिळेल तिथे पेरल्या. आज बाबा नाहीत पण बाबांच्या आठवणी या झाडांच्या रुपात कायम राहतील. त्याचबरोबर बाबांच्या रक्षाविसर्जनची राख नदीत न फेकता आम्ही जिथे झाड लावली आहेत त्या ठिकाणी ती राख घातली.  नदीतील पाणी खराब होऊ नये आणि या माध्यमातून स्वछतेचा संदेश जावा ही प्रामाणिक इच्छा होती." World  Environment Day

World  Environment Day
World  Environment Day

 छोट्या छोट्या गोष्टींमधून सुरुवात 

 पर्यावरण अभ्यासक आणि सिमला  मध्ये काम करणारी श्रृती कुलकर्णी सांगते, " पर्यावरण संवर्धनासाठी खुप मोठ्या गोष्टींची  गरज नाही आह, तर तुम्ही छोट्या-छोट्या गोष्टींपासून सुरुवात करत पर्यावरणाची काळजी घेवू शकता. श्रृती सांगतात," मी सुध्दा माझ्या दैनंदिन जगण्यात नैसर्गित संसाधनांचा अविवेकी वापर करत नाही ना याची पुरेपुर काळजी घेते, यासाठी मी काही गोष्टींपासुन सुरुवात केली आहे. जसे की, " कापडी पिशवीचा वापर, उपलब्ध जागी आपल्या गरजेपुरता भाजीपाला लावणे,  गरज नसेल तेव्हा विजेच्या उपकरणाचा वापर टाळणे, जिथे चालत जाणे शक्य असेल तर तिथे गाडीचा वापर करायचा नाही. अगदी खूप झाडे लावणे शक्य नसेल तर घरात किंवा आजूबाजूला ग्रीन कॉर्नर करावा, गार्डन मध्ये रासायनिक खते आणि कीटनाशके ऐवजी कंपोस्ट, नैसर्गिक कीटकनाशके वापरावी.

स्वतःपासून बदलाची सुरुवात

निसर्ग संवर्धन, वन्यजीव संवर्धन, प्लॅस्टिक निर्मूलन, तापमानवाढ रोखणे, पाण्याचे प्रदूषण रोखणे ही सध्या काळाची गरज आहे. निसर्गाने आजपर्यंत मानवजातीला दिलेल्या बहुमूल्य योगदानाबद्दल आपण सर्वांनी कृतज्ञता ठेवून या कृतज्ञतेच्या जाणीवेतून वरील सर्व मुद्द्यावर सकारात्मक काम करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे.

World  Environment Day
World  Environment Day

वर्ल्ड फॉर नेचर या संकल्पनेवर काम करणारे, अभिजित वाघमोडे सांगतात, "आज आपल्यातलेच काही लोक निसर्गाची सतत कत्तल करून वनसंपदेचा जगण्याचा अधिकारच हिरावून घेत आहेत. पण खरी गोष्ट अशी आहे की ते जगले तरच आपण जगू आणि आपण जर या निसर्गाशी, वृक्षांशी, वन्यजीवांशी प्रेमाने वागलो, त्यांचं जतन केलं तर आपला निसर्ग आपल्याला याची दुपटीने परतफेड करेल यात तिळमात्र शंका नाही. World  Environment Day

स्वतःपासून बदलाची सुरुवात करा. आज हा निसर्ग आपल्याला आर्तपणे साद घालत आहे की, "मला वाचवा, मला वाचवा" ही सगळी आपली वनसंपदा, झाडे वेली, वन्यजीव, जलस्रोत आपल्या इथून कायमचे जाण्यापूर्वी, हा निसर्ग पूर्णपणे संपण्यापूर्वी, ही जैवविविधता नष्ट होण्यापूर्वी त्यांना जाणून घेऊया, त्यांना जपूया, त्यांच्यासाठी मदतीचा हात आपण ही पुढे करूया.

मुलांना पर्यावरणाचे धडे

 पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे याचे परिणाम आपण प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या सहन करत आहोत. यावर बोलताना राष्ट्र सेवा प्रशालां शिरोली पुलाची येथे शिक्षिका म्हणुन कार्यरत असलेल्या जयश्री गंधारे म्हणतात, "पर्यावरण आपण जपला पाहिजे. आम्ही आमच्या शाळेतील मुलांना पर्यावरणाचे धडे मिळावेत म्हणुन कृतीशील उपक्रम घेतो. त्यांच्याकडून पर्यावरणाची हानी होणार नाही यासाठी त्यांना माहिती सांगतो. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यी  देशी बीया गोळा करतात, त्या संवर्धित करुन शाळेमध्ये बिया लावतात त्याचबरोबर ज्यांना गरज आहे त्यांनाही त्या बिया दिल्या जातात. खऱाब झालेल्या प्लॅस्टिकच्या बॉटल गोळा करुन त्यांचा वापर  झाडांना कट्टे करण्यासाठी करतो. World  Environment Day

या  छोट्या गोष्टींपासून पर्यावरणाची काळजी घेवू शकता…

काहीच न करण्यापेक्षा काहीतरी करणं खूप गरजेच असते. पर्यावरण वाचवण्यासाठी खुप काही मोठं कराव, खुप वेळ द्यावा अस काही नाही. पण तुम्ही तुमच्या जगण्यात काही गोष्टींचा वापर केला, काळजी घेतली तर नक्कीच तुम्ही पर्यावरण संतुलित ठेवण्यासाठी हातभार लावत आहात. जर तुम्हाला पर्यावरण संवर्धनास हातभार लावायचा असेल तर पुढील गोष्टी करा,

  • गरज असतानाच एखादी वस्तू खरेदी करा
  • जिथे चालत जाणे शक्य आहे, तिथे चालत जा किंवा सायकलचा वापर करा
  • उपलब्ध जागेवर झाडे लावा
  • घरातील ओला कचरा त्याचे कंपोस्ट खत तयार करा
  • प्लॅस्टिक पिशवी ऐवजी कापडी पिशवी वापरा
  • जिथे प्रकाशाची गरज नाही तिथे लाईट नका लावू
  • घरात जास्त प्रकाश येईल अशा पद्धतीने रचना करा

यंदाची पर्यावरण दिनाची थीम काय आहे?

दरवर्षी ५ जूनला जगभरात पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी एक थीम घेवून त्यावर काम केले जाते. यंदाची पर्यावरण दिनाची थीम ही "जमीन पुनर्संचयित करणे, वाळवंटीकरण आणि दुष्काळ प्रतिरोधकता" आहे. World  Environment Day

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news