White Cloth : ‘या’ उपायांनी येईल तुमच्या पांढऱ्या कपड्यांना चमक

‘या’ उपायांनी येईल तुमच्या पांढऱ्या कपड्यांना चमक
‘या’ उपायांनी येईल तुमच्या पांढऱ्या कपड्यांना चमक
‘या’ उपायांनी येईल तुमच्या पांढऱ्या कपड्यांना चमकWhite Cloth

पुढारी ऑनलाईन डेस्क : पांढरे कपडे (White Cloth) आपल्याला खूपच आवडतात; पण हे कपडे लवकर खराब हाेतात. तसेच पांढर्‍या रंगाचे कपड्यांना पिवळेपन आले तर? या कल्पनेनेही नकोसं होतं. पांढऱ्या कपड्यांवर एखादा डाग पडला तर किंवा कपड्याला पिवळसरपणा आला तर तो कपडा गुंडाळून ठेवतो. तो कपडा घालायचा टाळतो. 'चुटकी में सब कुछ' असे काही घरगुती उपाय आहेत ज्यांनी तुमच्या पिवळ्या पडलेल्या कपड्यांचा पिवळेपन जावून चमक येईल. चला तर मग जाणून घेवूया, पांढर्‍या कपड्यांना कशी चमक येईल याविषयी.

लिंबूचा रस

एका बादलीत गरम पाणी घ्या आणि लिंबू रस दोन चमचे घाला. थोड्यावेळाने पिवळे झालेले पांढरे कपडे त्या पाण्यात भिजत घाला. साधारणत: एका तासानंतर नेहमी कपडे धूता तसे धुवून घ्या. पहा अगदी कमी खर्चात तुमच्या पिवळ्या झालेल्या कपड्यांना चमक आलेली दिसेल.

बेकिंग सोडा

बादलीत पाणी घेवून त्यामध्ये एक कप बेकिंग सोडा मिसळून घ्या. त्यामध्ये तासभर कपडे भिजत ठेवा. तासाभरानंतर रेग्युलर वॉशिंग पावडरने धुवून घ्या. बऱ्यापैकी कपड्यांचा पिवळेपणा गेलेला दिसून येईल.

ब्लीच

बादलीत गरम पाणी घेवून त्यामध्ये ब्लीच घालून घ्या. त्यामध्ये कपडे कमीत-कमी १५ मिनिट भिजत ठेवा. नेहमी धुतो तशी कपडे धुवून घ्या. अशा पध्दतीने धुवून पिवळेपणा जात नसेल तर २ ते ३ वेळा ब्लीच घालून धुवून घ्या. ब्लीचचा वापर शक्यतो कॉटनच्या कपड्यांसाठी केला जातो.

व्हिनेगार

कपडे धुतल्यानंतर थोड्या पाण्यात व्हिनेगार घालून घ्या. साधारणत: अर्धा तास कपडे या पाण्‍यात भिजू द्या. कपड्यांचा पिवळेपणा जाण्यास मदत होईल. व्हिनेगारचा वापर सिल्क आणि रेयॉनसाठी वापरू नये.

White Cloth हेही लक्षात ठेवा

  • पांढरे कपडे कोमट पाण्यात धुवा.

  • नवीन पांढऱ्या कपड्यांना जुन्‍या पांढर्‍या कपड्यांसोबत धुवू नका. जुन्या पिवळ्या झालेल्या कपड्यातील धुळ, पिवळेपन नव्या पांढर्‍या कपड्यात जावू शकते.

  • पांढरे कपडे धुताना मर्यादित डिटर्जंट घ्या. अधिक डिटर्जंट म्हणजे कपडे स्वच्छ होतात हा गैरसमज दूर करा. वॉशिंग मशिनमधुन कपडे धुतल्यानंतर पुन्हा साध्या पाण्यातही कपडे धुवूुन घ्या.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news