

wheat chapati vs bajra roti for health and weight loss
पुढारी ऑनलाईन :
भाकरी किंवा चपाती हा आपल्या दैनदिन आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. चपाती किंवा भाकरी केवळ पोट भरण्यासाठी नाही, तर आरोग्यदायी आणि फिट राहण्यासाठीही मदत करते. आज या बातमीत आपण बाजरीची भाकरी आणि गव्हाची चपाती यापैकी कोणती जास्त हेल्दी आहे आणि का, हे जाणून घेणार आहोत.
रोटी भारतीय जेवणाचा अविभाज्य भाग आहे आणि बहुतांश घरांमध्ये ती रोज खाल्ली जाते. मात्र गव्हाची चपाती आणि बाजरीची भाकरी यापैकी एक निवडायची वेळ आली की अनेकांना गोंधळ होतो. यापैकी जास्त आरोग्यदायी कोणते?
गव्हाची चपाती हलकी असते आणि सहज पचते. तर बाजरीच्या भाकरीत फायबर, प्रोटीन आणि आयर्न जास्त प्रमाणात असते, त्यामुळे वजन कमी करण्यास आणि दीर्घकाळ ऊर्जा मिळण्यास मदत होते. अशा परिस्थितीत रोजच्या आहारासाठी बाजरीची भाकरी कि रोटी चांगली आहे, ते पाहूया.
फायबरच्या बाबतीत
बाजरीच्या एका भाकरीत गव्हाच्या चपातीपेक्षा जास्त फायबर असते.
गव्हाची चपाती: सुमारे 2.5 ग्रॅम फायबर
बाजरीची भाकरी: सुमारे 3.2 ग्रॅम फायबर
जास्त फायबरमुळे पोट जास्त वेळ भरलेले राहते आणि अन्न हळूहळू पचते. त्यामुळे रक्तातील साखर अचानक वाढत नाही.
प्रोटीनच्या बाबतीत
बाजरीची भाकरी: सुमारे 3.3 ग्रॅम प्रोटीन
गव्हाची चपाती: सुमारे 2.6 ग्रॅम प्रोटीन
म्हणजेच बाजरीच्या भाकरीत प्रोटीन थोडे अधिक असते. प्रोटीन शरीरातील पेशी दुरुस्त करण्यासाठी, स्नायू मजबूत करण्यासाठी आणि हाडांच्या विकासासाठी खूप महत्त्वाचे आहे.
आयर्नच्या बाबतीत
बाजरीच्या भाकरीत आयर्नचे प्रमाणही जास्त असते.
बाजरीची भाकरी: सुमारे 2.1 mg आयर्न
गव्हाची चपाती: सुमारे 1.1 mg आयर्न
आयर्नमुळे अॅनिमियापासून संरक्षण मिळते आणि शरीरातील सर्व अवयवांपर्यंत ऑक्सिजन पोहोचण्यास मदत होते, त्यामुळे थकवा कमी जाणवतो.
कार्बोहायड्रेट्स कुठे कमी आहेत?
गव्हाची चपाती: सुमारे 15.7 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स
बाजरीची भाकरी: सुमारे 19.1 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स
लो-कार्ब डाएट करणाऱ्यांसाठी किंवा कार्ब्स कमी ठेवायचे असतील तर गव्हाची चपाती हा चांगला पर्याय ठरू शकतो.
वर्षभर काय खाऊ शकतो?
गव्हाची चपाती वर्षभर खाता येते.
तर बाजरीची भाकरी उष्ण गुणधर्माची असल्यामुळे उन्हाळ्यात कमी खाण्याचा सल्ला दिला जातो. म्हणूनच बाजरीची भाकरी हिवाळ्यात जास्त प्रमाणात खाल्ली जाते.
निष्कर्ष काय निघतो...
बाजरी आणि गहू दोन्ही आरोग्यदायी आहेत. त्यामुळे आपल्या गरजा, ऋतू आणि आरोग्य लक्षात घेऊन बाजरीची भाकरी आणि गव्हाच्या पिठापासून केलेल्या चपाती अशा दोंन्हींचा आहारात आलटून-पालटून समाविष्ट करणे उत्तम ठरेल. यामुळे शरीराला सर्व आवश्यक पोषक घटक मिळतील.