WhatsApp Group : आता ‘व्हॉट्स ॲप’ ग्रुपमधील सदस्‍य संख्‍येत हाेणार वाढ! 

WhatsApp Group : आता ‘व्हॉट्स ॲप’ ग्रुपमधील सदस्‍य संख्‍येत हाेणार वाढ! 

WhatsApp Group : आता ‘व्हॉट्स ॲप’ ग्रुपमधील सदस्‍य संख्‍येत हाेणार वाढ! 
WhatsApp Group : आता ‘व्हॉट्स ॲप’ ग्रुपमधील सदस्‍य संख्‍येत हाेणार वाढ! 
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क:आज सोशल मीडियामध्ये सर्वात लोकप्रिय माध्यम कोणतं, असा प्रश्‍न केल्‍यास बहुतांश जण त्‍याचे उत्तर व्हॉट्स ॲप असेच देतील. हे ॲप आपल्या युझर्सना नेहमी हटके आणि धमाकेदार फिचर देत असल्याने सोशल मीडिया युझर्समध्ये त्याची लोकप्रियताही दिवसेंदिवस वाढत आहे. व्हॉट्स अ‍ॅपने आता आणखी एक नवे फिचर आपल्या युझर्ससाठी आणले आहे. आता व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये (WhatsApp Group) असणाऱ्या सदस्यसंख्येत वाढ करण्‍याचा कंपनीचा विचार सुरु आहे.

WhatsApp Group : काय आहे नवे फिचर?

मेटा कंपनीचा (META) सीइओ मार्क झुकरबर्गने (Mark Zuckerberg) दोन दिवसांपूर्वी व्हॉट्सॲपच्या नव्या फिचरची घोषणा केली होती. या फिचरमध्ये इमोजीद्वारे तुम्ही रिॲक्शन्स देवू शकणार आहात. ही खुशखबर त्यांनी युझर्सना दिली तोपर्यंत त्याने आणखी एक खुशखबर आपल्या युझर्ना दिली आहे. ती म्हणजे व्हॉट्स ॲप ग्रुपमधील २५९ सदस्यसंख्‍या आता ५१२ एवढी वाढवता येणार आहे.

संभाषणात सुलभता आणण्यासाठी, एकाचवेळी अनेकांशी संवाद साधण्यासाठी, जोडण्यासाठी ही सुविधा देण्‍यात आली आहे. या ग्रुपमध्ये फक्त २५९ व्हॉट्स ॲप युझर्सना सामील करुन घेवू शकत होता; पण आता व्हॉट्सॲप लवकरच ग्रुपमधील सदस्य संख्या वाढवण्याच्या विचारात आहे. आता २५९ ऐवजी ५१२ सदस्य असणार आहेत; पण सध्या या फिचरचे टेस्टींग बीटा व्हर्जनवर सुरु आहे, अशी माहिती व्हॉट्स ॲपच्या नव्या फिचरची माहीती देणाऱ्या WABetainfo या वेबसाईटने दिली आहे.

नव्या (WhatsApp Group) फिचरमूळे एखादी संस्था, व्यावसायिक, एका विचारांची लोक यांसाठी हे नवे फिचर उपयोगी पडणार आहे. लवकरच ते व्हॉट्स ॲप युझर्सना उपल्बध होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news