WhatsApp Paid Subscription: WhatsApp साठी आता पैसे द्यावे लागणार... हे तीन फीचर मोफत मिळणार नाहीत

WhatsApp Paid Subscription
WhatsApp Paid Subscriptionpudhari photo
Published on
Updated on

WhatsApp Paid Subscription: WhatsApp आता पेड सब्सक्रिप्शन मॉडेल घेऊन येणार आहे. याबाबतचे अॅपमध्ये एक नोटिफिकेशन देखील दिसत आहे. मेसेजिंग अॅप व्हॉट्स अॅपचे येणारे फीचर्स ट्रॅक करणारी वेबसाईट WaBetainfo ने ही माहिती शेअर केली आहे. WhatsApp चे हे पेड सब्सक्रिप्शन ऑप्शनल असणार आहे.

आता WhatsApp मसेंजिंग अॅपने याबाबतचे एक नोटिफिकेशन प्रसिद्ध करायला सुरूवात केली आहे. यात पेड सब्सक्रिप्शन मिळणार असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रीमियम सब्सक्रिप्शन प्लॅननुसार युजर्सला नवीन फीचर्सचा अॅक्सेस मिळणार आहे.

प्ले स्टोरअवर नवा अपडेट

WaBetainfo ने दिलेल्या माहितीनुसार प्ले स्टोरवर WhatsApp beta चे लेटेस्ट वर्जन Android 2.26.9.6 मध्ये फिचर स्पॉट करण्यात आलं आहे. युजर्स या नव्या प्लॅनसाठी waitlist जॉईन करू शकतात.

WaBetainfo ची पोस्ट

मिळालेल्या माहितीनुसार WhatsApp चे नवीन फीचरबाबत या वेबसाईटवर स्क्रीनशॉट्स शेअर करण्यात आले आहेत. यात नवीन अपडेट दाखवण्यात आले आहेत. स्क्रीनशॉट्समध्ये सांगितलं की प्रीमीयम सब्सक्रिप्शननुसार युजर्सला नवीन फिचर्स देखील मिळणार आहेत.

प्रीमीयम सब्सक्रिप्शनद्वारे मिळणारे नवे फीचर्स

  • एक्सक्लुजिव स्टीकर

  • एक्स्ट्रा पिन चॅट करण्याची संधी

  • वेटलिस्ट देण्याचा उद्येश

WhatsApp प्लसच्या सुरूवातीच्या स्टेजमध्ये युजर्सना वेटलिस्टसाठी साईन अप करायचं आहे. वेटलिस्टमध्ये साईन अप केल्यानं तुम्हाला ज्यावेळी WhatsApp चे सब्सक्रिप्शन प्लॅन उपलब्ध होईल त्यावेळी ते सब्सक्रिप्शन घ्यावच लागेल असं नाही.

हे सांगणं गरजेचं

मेसेजिंग अॅप WhatsApp ने नवीन फीचर फक्त यासाठी तयार केलं की WhatsApp यूजर्सला माहिती व्हावं की त्यांचे अकाऊंट या प्लॅनसाठी पात्र आहे. प्लॅन एकदा का उपलब्ध झाले की सब्सक्रिप्शनसाठी वेगळी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news