Safety Tips When Indian Gaur Appears While Traveling|जंगलवाटातून जाताना अचानक गवा समोर आल्यावर काय करायंच?

Safety Tips When Indian Gaur Appears While Traveling- जंगलवाटातून जाताना अचानक गवा समोर आल्यावर काय करायंच?
Indian Gaur
Safety Tips When Indian Gaur Appears While TravelingAI photo
Published on: 
Updated on: 

मध्यंतरी इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका महिलेने प्रवासदरम्यानचे आपले अनुभव शेअर केले होते. फोंडा घाटातून कोकणात जाताना चालत्या गाडीसमोर अचानक गवा आल्याने गाडीतील सर्वांचीच तारांबळ उडाली होती. प्रसंगावधान राखत गाडी सुरक्षितपणे निश्चितस्थळी गेली. पण आपण अनेकदा प्रवास घडताना आपल्या सोबत देखील अशाच घटना घडतात किंवा घडू शकतात.

प्रवासादरम्यान विशेषतः घाटमाथा, जंगल परिसर किंवा पश्चिम घाटातील रस्त्यांवर अचानक गवा समोर आल्यास वाहन सुरक्षित अंतरावर थांबवा. इंजिन सुरू ठेवून शांत राहा आणि गव्याला रस्ता ओलांडून जाण्यासाठी पुरेसा वेळ द्या. गवा दिसायला शांत वाटत असला तरी तो आकाराने अत्यंत मोठा आणि वेगवान असतो; त्याला घाबरवणे किंवा त्याच्या जवळ जाणे धोकादायक ठरू शकते.

पटकन काय करावे?

वाहनाचा वेग त्वरित कमी करायला विसरू नका. गवा दिसताच ब्रेकवर पाय ठेवून वाहन सहजपणे थांबवा आणि सुरक्षित अंतर ठेवा. गाडीत आतमध्ये लाईट्स सुरू असतील तर लगेच बंद कराव्यात.

हॉर्न आणि अनावश्यक आवाज टाळावे. जोरात हॉर्न वाजवणे, गाणी मोठ्याने लावणे किंवा आरडाओरडा केल्यास गवा बिथरून हल्ला करू शकतो. त्यामुळे शांतच राहणे हितकारक ठरते.

अशावेळी गाडी लगेच बंद करू नका, इंजिन सुरू ठेवा. रात्री किंवा अंधारात हाय-बीम दिवे डोळ्यांवर थेट मारणे टाळावे. आवश्यक असल्यास डिम किंवा पार्किंग दिवे सुरू ठेवा.

कार किंवा बसमध्ये असाल तर खिडक्या-दरवाजे बंद ठेवून आतच राहा. दुचाकीवर असल्यास गव्याच्या दिशेने न जाता सुरक्षित अंतरावर थांबा आणि संधी मिळाल्यास मागे जा.

फोटो किंवा व्हिडिओ काढण्यासाठी जवळ जाऊ नये. सेल्फी किंवा फोटो काढण्यासाठी वाहनातून खाली उतरणे हा सर्वात मोठा धोका ठरू शकतो.

गव्याचा पाठलाग करू नका किंवा रस्ता अडवू नका: तो रस्ता ओलांडत असताना गाडी पुढे नेण्याचा प्रयत्न करू नका. त्याला जंगलाच्या किंवा कडेच्या दिशेने निघून जाण्यास मार्ग मोकळा करून द्या.

Indian Gaur
Homemade Puffed Malvani Vade Recipe|चिकन करीसोबत खायला टम्म फुगलेले मालवणी वडे घरी कसे बनवायचे? जाणून घ्या सोपी कृती

गव्याचा कळप समोर आल्यास...

गव्यासोबत वासरे (कळप) असल्यास संरक्षणासाठी तो अधिक आक्रमक होऊ शकतो. गव्याच्या हालचालींवरून संभाव्य धोका ओळखता येते. घाटमाथा, राधानगरी किंवा सह्याद्रीच्या पट्ट्यातील प्रवासात अशी परिस्थिती उद्भवल्यास स्थानिक वन विभागाच्या हेल्पलाईनवर माहिती देणे योग्य ठरते. प्रवासापूर्वी इमरजन्सी म्हणून संपर्क क्रमांक जवळ नोंद करून ठेवणे, कधीही फायदेशीर ठरेल.

Indian Gaur
Shawarma Taste Evolution From Turkey to India| तुर्कीच्या 'डोनर'पासून ते देशी शॉर्मापर्यंत! जाणून घ्या भारतात येताच चवीत कसा झाला मोठा बदल?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.