Viral Video: महागड्या एसीला विसरा; फक्त ८०० रुपयांच्या व्हायरल जुगाडाने छताचे तापमान १५ अंशांनी कमी होणार!

एका व्यक्तीने अवघ्या ८०० रुपयांत घराचे छत थेट १५ अंशांनी थंड करण्याचा दावा केला असून, या युक्तीने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
Viral Roof cooling hack
Viral Roof cooling hack
Published on
Updated on

Viral Roof cooling hack

नवी दिल्ली: देशभरात पारा ४० अंश सेल्सिअसच्या पार गेला असून नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. अशा कडक उन्हात छताचे पंखेही गरम हवा फेकू लागतात आणि सर्वसामान्य नागरिक सुटकेसाठी महागड्या एसीचा पर्याय शोधू लागतात. मात्र, या प्रचंड उष्णतेच्या पार्श्वभूमीवर सध्या सोशल मीडियावर एक नवा देसी जुगाड व्हायरल होत आहे.

एका व्यक्तीने अवघ्या ८०० रुपयांत घराचे छत थेट १५ अंशांनी थंड करण्याचा दावा केला असून, या युक्तीने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. ३० हजारांचा एसी खरेदी करण्याऐवजी ८०० रुपयांचा हा उपाय सध्या सर्वसामान्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

काय आहे व्हायरल जुगाड?

'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये या व्यक्तीने छताचे तापमान कमी करण्यासाठी एक सोपा उपाय सांगितला आहे. त्याच्या दाव्यानुसार, डॉ. फिक्सिट युआरपी, पांढरा चुना, फेव्हिकॉल, या तिन्हींचे मिश्रण एकत्र करून छतावर त्याचा एक थर दिल्यास, सिमेंटच्या छताचे तापमान तब्बल १५ अंशांनी कमी होऊ शकते.

वैज्ञानिक तर्क काय आहे?

एसी किंवा कुलर पेक्षा हा उपाय अत्यंत सोप्या तर्कावर काम करतो. कडक उन्हामुळे सिमेंटचे छत एखाद्या तव्यासारखे तापते आणि रात्रीही घरात उष्णता निर्माण करते. या मिश्रणामुळे छतावर तयार होणारा पांढरा, परावर्तित (Reflective) थर सूर्याची किरणे शोषून घेण्याऐवजी ती परतवून लावतो. ही पद्धत तशी जुनीच असली, तरी आधुनिक काळात विजेवर अवलंबून राहण्याच्या आपल्या सवयीमुळे ती मागे पडली होती.

Viral Roof cooling hack
Solar energy | सौरशक्तीची अनिवार्यता आणि भारत

फेव्हिकॉल का महत्वाचा?

छतावर नुसता चुना लावला तर तो पहिल्याच पावसात वाहून जाण्याची भीती असते. या जुगाडात वापरण्यात आलेले फेव्हिकॉल चुन्याला छतावर मजबूत पकड मिळवून देते. यामुळे हा थर दीर्घकाळ टिकून राहतो आणि पावसाळ्यातही निघत नाही, असा दावा या व्हिडिओमध्ये करण्यात आला आहे.

महागड्या वीज बिलापासून सुटका?

वीज बिलाचा विचार करता ८०० रुपयांचा हा घरगुती उपाय मध्यमवर्गीयांसाठी मोठा दिलासा ठरू शकतो. सोशल मीडियावर हा व्हिडिओ नेटकरी शेअर करत आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाला आव्हान देणारा हा स्वस्त आणि मस्त जुगाड सध्या उन्हाळ्यातील चर्चेचा विषय ठरला आहे.

Viral Roof cooling hack
Jaipur heat solutions homes | जयपूरमधील 4000 घरांनी उष्णतेवर ‘असा’ मिळवला विजय

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news