Konkan Devbag Explore : ‘देवबागच्या मिनी केरळ’ला गेलात का?

देवबाग
देवबाग

पुढारी ऑनलाईन डेस्क : काही महिन्यांपूर्वी आम्ही कोकण सफरची मालिका आपल्यासाठी आणली होती. आंबोळगड, कशेळी, देवघळी, रत्नागिरी, गणेशगुळे, भोगवे, निवती अशा अऩेकविध पर्यटन ठिकाणांची इत्यंभूत माहिती आम्ही दिली होती. (Konkan Devbag Explore) आता आम्ही तुम्हाला देवबागची सफर दाखवणार आहोत. तुम्हाला माहितीये का, देवबागमध्ये मिनी केरळदेखील आहे. तसेच युरोपमधून हिवाळ्यात येणारे सीगल पक्षी देखील स्वच्छंदी फिरताना तुम्हाला दिसतात. बांगडे, सुरमई, कोळंबी, चिकन अशी मेजवानी तर उत्तमचं असते. याठिकाणी तुम्ही ग्रुप, फॅमिली आणि सोलो ट्रीप देखील करू शकता. स्कूबा डायव्हिंग, बनाना, वल्हे हाकायची नौका चालवण्याची मजा तर ट्रीपमध्ये आणखी रंगत वाढवणारी ठरेल. तर मग सुट्टीत देवबागचा प्लॅन करताय ना! (Konkan Devbag Explore)

संबंधित बातम्या –

देवबागला जाताना तुम्हाला वाटेत तारकर्ली लागते. विशेष म्हणजे तारकर्ली-देवबाग हे दोन्ही किनारे एकदम स्वच्छ आहेत. तारकर्ली आणि देवबाग दोन्ही पर्यटन स्थळे पाहण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागेल. याठिकाणी हिवाळ्यात फिरणे खूर सोईस्कर ठरते. कारण, यावेळी येथील तापमान फार जास्त नसते. शिवाय फिरतानाही उन्हाचा फार त्रास होणार नाही. जाणून घेऊया कोणकोणत्या ठिकाणी भेटी देता येतील?

तारकर्ली –

तारकर्ली बीच अनेक ॲक्टिव्हीटीसाठी प्रसिद्ध आहे. तारकर्लीच्या समुद्रकिनारी वारंवार खळखळत येणाऱ्या लाटा तुमच्या पायाला स्पर्श करून जातात. शंख-शिंपले आणि छोटे-छोटे खेकडे आपले लक्ष वेधून घेतात. कोल्हापूर शहरापासून हे अंतर जवळपास १६० किलोमीटर आहे. येथे तुम्हाला वॉटर स्पोर्ट्सचीदेखील सुविधा आहे. पर्यटकांना येथे स्नोकर्लिंग, कयाकिंग, जेट स्की राईड, बम्पर राईड, पॅरासेलिंग, बनाना राईड, बनाना, स्कूबा डायव्हिंग यासारखे वॉटर ॲडव्हेंचर स्पोर्ट्सचा आनंद घेता येतो.

संग्रहित-पॅरासेलिंग
संग्रहित-पॅरासेलिंग

तारकर्लीला कसे जाल?

कोल्हापूरमधून जाणार असाल तर कोल्हापूर-राधानगरी-फेजिवडे-एजिवडे-देवगड निपाणी हायवे-फोंडा घाट-फोंडा-कणकवली-मुंबई-गोवा हायवे- कसाल मालवण रोड-कट्टा-चौके-तारकर्ली रोड-तारकर्ली बीच, ( (Konkan Devbag Explore))

देवबाग –  

सीगल बर्ड – 

युरोपमधून हिवाळ्यात हे पक्षी काटेरी मासे खाण्यासाठी समुद्रात येतात. पांढऱ्या रंगाचे असंख्य पक्षी पाण्यावर तरंगताना दिसतात.

देवबाग बीच

देवबाग बीचचा समुद्र किनारा लांब आणि चमकत्या पांढऱ्या वाळूने पसरलेला आहे. देवबागचा निळाशार समुद्र तुम्हाला आकर्षित करतो. येथूनच तुम्हाला बोटीतून खाडीमध्ये नेले जाते. तिथे बोटीतूनच तुम्हाला वेगवेगळे ठिकाणे दाखवली जातात. पण, समुद्र खाडीपासून थोड्या लांब अंतरावर आहे. शिवाय समुद्रतळ अगदी जवळ असल्याने बोट फसण्याची शक्यता असते. त्यामुळे बोट खाडीतूनच फिरवली जाते. पण, तुम्हाला बोटीतून डोळ्यांनी समुद्र पाहता येतो. पुढे खाडीतून त्सुनामी आयलँडवर नेलं जातं. याची माहिती आम्ही पुढे वाचा.

होड्यांची सफर

देवबाग संगम पॉईंट / डेल्टा संगम पॉईंट –

नीरव शांततेतील देवबाग आणि कर्ली नदीच्या संगमाचे ठिकाण आहे. देवबाग संगम ज्याला डेल्टा पॉईंटदेखील म्हटले जाते. अरब समुद्रात जाऊन मिळणाऱ्या कर्ली नदीचा संगम इथे पाहायला मिळतो. हा संगम पाहायला तुम्हाला बोटीतून नेलं जातं.

सनसेट पॉईंट –

देवबागच्या बीचवरून बोटीतून कर्ली नदीच्या खाडीमध्ये गेल्यानंतर संध्याकाळचा सुंदर सनसेट पॉईंट पाहायला मिळतो. सभोवतालच्या निसर्गावर, तुमच्या होडीवर आणि पाण्यात पडणारी सुर्याची किरणे पाहून चांदण्या चमकत असल्याचा भास होतो. बोटीचा प्रवास हा १ तासाचा असतो.

खारफुटी, मँग्रुव्ह्ज झाडे –

बोटीतून थोडे जवळून तुम्हाला खारफुटी आणि मँग्रुव्ह्जची झाडे पाहायला मिळतात.

मिनी केरळ –

मोटरच्या बोटीतून फिरताना सभोवताली गर्द झाडीतील नारळ, सुपारीची झाडे निदर्शनास येतात. केरळप्रमाणे देवबागमधील ‍नारळांच्या गर्द झाडींचा लांब पल्ला डोळ्यांनी पाहून अनुभवता येतो. समुद्रकिनारी, मासेमारी आणि रापण करताना मच्छिमार कोळी बांधव दृष्टीस पडतात. या ठिकाणाला मिनी केरळ असे म्हटले गेले आहे.

भोगवे बीच –

त्या बोटीतूनच भोगवे समुद्र पाहता येतो. तुम्ही देवबाग झाल्यानंतर भोगवे बीचलादेखील भेट देऊ शकता. पण इथे राहणे थोडे खर्चिक असल्यामुळे काही जण फक्त समुद्रकिनारी भेट द्यायला जातात. त्याच्या तुलनेत तारकर्ली, देवबाग, मालवण येथे राहणे सोईस्कर ठरते.

कर्ली नदी खाडी –

देवबागच्या समुद्राचे वैशिष्ट्य म्हणजे कर्ली नदी जी अरबी समुद्राला येऊन मिळते. तो हा संगम पॉईंट होय.
त्सुनामी आयलँड – देवबाग संगम पॉईंट, सीगल पक्षी, मिनी केरळ, कर्लीची खाडी पाहिल्यानंतर त्सुनामी आयलँडवर नेलं जातं. अगदी सहजपणे बोटीतून तुम्ही या ठिकाणी उतरू शकता. या आयलँडला लागून असलेली खाडी ज्यामध्ये तुम्ही कंबर एवढ्या पाण्यात चालत जाऊ शकता. आयलँडवर छोट्या खेकड्यांची असंख्य घरे पाहायला मिळतील. इथे मॅगी, चीज मॅगी, उकडीचे मोदक, कोकम, सोलकढी, आमरसची चवदेखील चाखता येते. शिवाय अगदी माफक दरात छोट्या-छोट्या वल्ह्याच्या नौका पाहायला मिळतात, ज्या तुम्ही स्वतछ चालवू शकता. भिरभिरणारे समुद्री खारे वारे शरीराला स्पर्शून जातात.

देवबागला कसे जाल? 

तारकर्ली ते देवबाग केवळ ७ किमी अंतरावर आहे. फोर व्हिलर अशेल तर तारकर्लीतून २० मिनिटांमध्ये देवबगला पोहोचता येते.

कुठे राहाल?

येथे राहण्यासाठी अनेक रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे लक्झरी हॉटेल्सच्या सुविधादेखील आहेत. खास म्हणजे बीचसमोर अनेक कॉटेजेस किंवा हॉटेल्स आहेत, जिथून तुम्ही खळखळत्या समुद्राच्या लाटांचा आनंद घेऊ शकता.

काय खाल?

मच्छि आणि कोळंबीची मेजवानी कोकणातच भारी वाटते. तेथे गेल्यानंतर मांसाहार आणि शाकाहार दोन्ही जेवण उपलब्ध आहेत. मच्छिमध्ये सुरमई, पापलेट, बांगडा आणि अन्य प्रकारचे मासे, सुकी बोंबील, प्रॉन्झ, कोळ‍ंबी, सोलकढी, उकडी भात, मच्छीकरी, अंडाकरी, चिकनकरी, तांदळाची भाकरी, शाकाहारमध्ये उकडी मोदक, उकडी भात, वरण, पापड, लोणचे, आमटी, उसळ भाजी, बटाटे भाजी, चपाती, ताक.

devbag lighthouse
devbag lighthouse

आणखी काय पाहाल?

मगरीच्या आकाराचा डोंगर, देवबाग लाईट हाऊस, कर्ली नदी, गाडेधेव जेट्टी.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news