तुमचा WhatsApp स्टेटस अन् Insta स्टोरी अस्पष्ट दिसते का? फक्त एक सेटिंग बदला आणि HD क्वालिटी अनुभवा!

WhatsApp Instagram HD setting: WhatsApp, Instagramवरील फोटो-व्हिडिओ चांगल्या गुणवत्तेचे लावायचे असतील तर या ट्रिक्स नक्की वापरा...
तुमचा WhatsApp स्टेटस अन् Insta स्टोरी अस्पष्ट दिसते का? फक्त एक सेटिंग बदला आणि HD क्वालिटी अनुभवा!
Published on
Updated on

जेव्हा तुम्ही WhatsAppवर स्टेटस लावता किंवा Instagramवर स्टोरी किंवा कोणतीही पोस्ट करता, तेव्हा ती HD क्वालिटीमध्ये दिसण्याऐवजी अस्पष्ट (धुंधळी) दिसते का?, तुमच्यासोबतही असे कधी घडलंय का? याचे कारण काही 'डिफॉल्ट सेटिंग्स' आहेत.

तुमचा WhatsApp स्टेटस अन् Insta स्टोरी अस्पष्ट दिसते का? फक्त एक सेटिंग बदला आणि HD क्वालिटी अनुभवा!
WhatsApp Privacy Alert| सावधान! आता Google Gemini वाचणार तुमचे खाजगी WhatsApp मेसेज; लगेचच बदला 'हे' महत्त्वाचं सेटिंग

WhatsApp आणि Instagram सारखे ॲप्स उत्तम अनुभव देण्यासाठी डिफॉल्ट सेटिंग्ज 'लो'वर (कमी गुणवत्ता) सेट केलेले असतात. यामुळे, जेव्हा तुम्ही WhatsAppवर स्टेटस किंवा Instagramवर स्टोरी लावता, तेव्हा ते सर्वोत्तम गुणवत्तेत दिसत नाहीत. चला, तर मग तपशीलवार समजून घेऊया की, कोणत्या सेटिंग्स बदलून तुम्ही तुमचा WhatsApp स्टेटस आणि Instagram स्टोरी अधिक चांगल्या (HD) प्रकारे दाखवू शकता.

तुमचा WhatsApp स्टेटस अन् Insta स्टोरी अस्पष्ट दिसते का? फक्त एक सेटिंग बदला आणि HD क्वालिटी अनुभवा!
WhatsApp Privacy: चॅटमधील गप्पा AI साठी वापरण्यापासून कसं रोखणार?, ताबडतोब बदला 'ही' खास सेटिंग

WhatsApp मध्ये बदला ही सेटिंग

जर तुम्हाला WhatsApp मध्ये चांगल्या गुणवत्तेचे स्टेटस लावायचे असतील, तर:

  • WhatsApp च्या Settings मध्ये जा.

  • त्यानंतर Storage आणि Data वर टॅप करा.

  • त्यानंतर Media Upload Quality ला (मीडिया अपलोड गुणवत्ता) HD वर सेट करून 'सेव्ह' करा.

  • यानंतर तुम्ही जो काही स्टेटस WhatsApp वर लावाल, तो चांगल्या गुणवत्तेत (HD) दिसेल.

Instagram मध्ये बदला ही सेटिंग्स

Instagram वर सर्वोत्तम गुणवत्तेत स्टोरी आणि पोस्ट शेअर करण्यासाठी:

  • तुमच्या प्रोफाइल पिक्चर वर टॅप करा.

  • त्यानंतर वरच्या उजव्या बाजूला दिसत असलेल्या तीन रेषांवर (हॅमबर्गर मेन्यू) टॅप करा.

  • खाली स्क्रोल करा आणि Media Quality (मीडिया गुणवत्ता) वर टॅप करा.

  • त्यानंतर Upload at highest Quality (सर्वोत्तम गुणवत्तेत अपलोड करा) ही सेटिंग ऑन (चालू) करा.

तुमचा WhatsApp स्टेटस अन् Insta स्टोरी अस्पष्ट दिसते का? फक्त एक सेटिंग बदला आणि HD क्वालिटी अनुभवा!
Motivation In Life | कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा आणि अनुभवा बदल! या 5 सवयींनी वाढेल तुमचा आत्मविश्वास

फोटो, व्हिडिओ क्वालिटीसाठी 'हे' कॅमेरा सेटिंग्स बदला

वर सांगितलेल्या दोन सेटिंग्स बदलल्यानंतर, तुम्ही तुमच्या फोनच्या कॅमेऱ्यातून सर्वोत्तम सेटिंग्समध्येच शूटिंग करत आहात याची खात्री करणे महत्त्वाचे आहे. पुढील स्टेप्स फॉलो करा...

  • तुम्ही तुमच्या फोनमधील कॅमेऱ्याच्या Settings (सेटिंग्ज) मध्ये जा.

  • चांगला फोटो घेण्यासाठी साईज (आकार) 16:9 रेशो वर सेट करा.

  • याव्यतिरिक्त, फोटो क्लिक करताना तुमच्या फोननुसार जास्तीत जास्त मेगापिक्सल मध्ये क्लिक करा.

  • त्याचप्रमाणे, व्हिडिओसाठी 4K 30fps किंवा 4K 60fps निवडा.

  • तसेच, व्हिडिओमध्ये Stabilization (स्थिरीकरण) देखील 'ऑन' करा.

  • याव्यतिरिक्त, कॅमेरा सेटिंग्समध्ये Grid Lines (ग्रीड रेषा) 'ऑन' करून तुम्ही तुमचा फोटो किंवा व्हिडिओमधील विषयाला (subject) योग्य ठिकाणी ठेवू शकता. या सर्व सेटिंग्स तुम्हाला सर्वोत्तम गुणवत्तेत (Best Quality) शूट करण्याची अनुमती देतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news