आजकाल प्रत्येकजण महागडा मोबाईल बाळगण्याचे स्वप्न बाळगून असतो. हे स्वप्न पूर्ण झाल कि दुसरीच चिंता मनाला लागून राहते ती मोबाईल सुरक्षित ठेवण्याची. आपला मोबाईल चोरी होऊ नये याची काळजी प्रत्येकजण घेत असतो. दुर्दैवाने मोबाईल चोरीला गेलाच तर त्याचा बरेचदा ट्रेस लागणं अशक्य होत. कारण चोरणाऱ्याने तो बंद केलेला असतो. अशा वेळी सोप्या ट्रिक्सच्या मदतीने तुम्ही हे टाळू शकता. फोनच्या सेटिंगमध्ये काही छोटे बदल करून तुम्ही हे टाळू शकता.
यासाठी मोबाईलमधील सेटिंग उघडा. सिक्युरिटी आणि प्रायव्हसी हा पर्याय निवडा. त्यातील मोअर सिक्युरिटी आणि प्रायव्हसी हा ऑप्शन उघडा. यात पर्याय असेल Required passward to power off. हा पर्याय निवडा. आता चोराजवळ तुमचा पासवर्ड नसेल तर तो तुमचा फोन बंद करू शकणार नाही.
यात असलेला दुसरा पर्याय म्हणजे ऐरोप्लेन मोडचे सेटिंग. सेटिंगमध्ये जाऊन नोटिफिकेशन आणि स्टेटस बार उघडा. त्यातील More settings या पर्यायावर जाऊन Turn off : swipe down on lock screen to view notification drawer हा पर्याय बंद करा. यामुळे एअरोप्लेन मोडमध्ये जाऊन फोन बंद करणं शक्य होणार नाही.
आता तिसरा पर्याय म्हणजे सेटिंग्जमध्ये सिक्युरिटी आणि प्रायव्हसीमधील device finders हा पर्याय निवडा. तो ऑन करा. यातील network in all areas हा पर्यायही ऑन करा. यामुळे फोनचे लास्ट लोकेशन ट्रेस करणं सोपं जाईल.