Paytm, PhonePe, Google Payरून आपोआप पैसे कट होतायत...'ऑटोपेमेंट' कसे थांबवाल? जाणून घ्या सोपी पद्धत

upi autopay cancel: 'हे' फीचर दर महिन्याला ठरलेल्या वेळी आपोआप पेमेंट पूर्ण करते, त्यामुळे ते बंद करणे महत्त्वाचे ठरते.
upi autopay cancel
upi autopay cancel
Published on
Updated on

नवी दिल्ली: UPIने (युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस) डिजिटल पेमेंट खूपच सोपे केले आहे. अनेक UPI ॲप्समध्ये 'AutoPay' (ऑटोपे) फीचर उपलब्ध आहे, जे युजर्संना बिल भरणे, सबस्क्रिप्शन घेणे आणि रिचार्ज करणे यांसारखे पेमेंट आपोआप करण्याची सुविधा देते. हे फीचर दर महिन्याला ठरलेल्या वेळी आपोआप पेमेंट पूर्ण करते. पण अनेकदा हे 'ऑटोपे' फीचर सुरु केल्यानंतर आपल्याला ते बंद करण्याची गरज भासते. अशावेळी, हे ऑटो-पेमेंट बंद करणे महत्त्वाचे ठरते.

जर तुम्ही Paytm, PhonePe किंवा Google Pay (GPay) यांसारख्या UPI ॲप्सवर 'AutoPay' वापरत असाल, तर खाली दिलेल्या सोप्या पद्धतीने तुम्ही हे 'ऑटोपेमेंट' फीचर तात्पुरते थांबवू शकता किंवा पूर्णपणे रद्द करू शकता. यामुळे तुम्हाला तुमच्या ऑटो-डेबिट पेमेंटवर नियंत्रण ठेवता येईल.

upi autopay cancel
UPI Autopay | UPI चा नवा 'धमाकेदार' नियम! आता Google Pay, PhonePe चे ऑटोपेमेंट्स एकाच ठिकाणी दिसणार!

Paytmवर UPI AutoPay कसे बंद करावे?

  • सर्वात आधी Paytm ॲप उघडा.

  • प्रोफाइल विभागात जा आणि Automatic Payments पर्यायावर टॅप करा.

  • येथे तुम्हाला सर्व 'सक्रिय' (Active) ऑटोपेमेंट्सची यादी दिसेल.

  • जे ऑटोपेमेंट बंद करायचे आहे, ते निवडा. थोडे खाली स्क्रोल केल्यावर तुम्हाला ‘Pause’ (थांबवा) किंवा ‘Stop’ (थांबवा/बंद करा) करण्याचा पर्याय मिळेल.

  • या पद्धतीने तुम्ही Paytm ॲपवरील ऑटो डेबिट पेमेंट्स काही काळासाठी थांबवू शकता किंवा कायमस्वरूपी बंद करू शकता.

upi autopay cancel
UPI AutoPay तुमच्या खात्यातून पैसे कट होत आहेत? तर हे असू शकते कारण

PhonePeवर UPI AutoPay कसे बंद करावे?

  • सर्वात आधी PhonePe ॲप उघडा.

  • प्रोफाइल विभागात जा आणि Manage Payments (पेमेंट्स व्यवस्थापित करा) पर्यायावर टॅप करा.

  • Autopay (ऑटोपे) पर्यायावर क्लिक करा, जिथे तुम्हाला सर्व 'सक्रिय' (Active) AutoPay Mandates दिसतील.

  • जे ऑटो-पेमेंट बंद करायचे आहे, ते निवडून तुम्ही ते थांबवू किंवा रद्द करू शकता.

upi autopay cancel
Vivo इतक्या कमी किंमतीत, स्टायलिश डिझाईन आणि जबरदस्त फीचर्ससह 'हा' स्मार्ट फोन आता भारतात होणार लॉन्च

GPay (Google Pay) वर UPI AutoPay कसे बंद करावे?

  • सर्वात आधी फोनमध्ये Google Pay ॲप उघडा.

  • आता प्रोफाइल मध्ये जाऊन Autopay (ऑटोपे) पर्यायावर क्लिक करा.

  • येथे Live टॅबमध्ये क्लिक केल्यावर तुम्हाला सर्व 'सक्रिय' (Active) AutoPay Mandates दिसतील.

  • जे पेमेंट बंद करायचे आहे, ते निवडा. तुम्हाला येथे Pause Autopay (ऑटोपे थांबवा) आणि Cancel Autopay (ऑटोपे रद्द करा) हे पर्याय मिळतील.

  • जर तुम्हाला काही काळासाठी ऑटोपेमेंट थांबवायचे असेल, तर Pause Autopay निवडा.

  • जर ऑटो पेमेंट पूर्णपणे बंद करायचे असेल, तर Cancel Autopay निवडून ते कायमस्वरूपी रद्द करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news