

पुढारी ऑनलाईन डेस्क: UPI outage | आज १२ एप्रिल रोजी UPI सेवांमध्ये मोठा अडथळा निर्माण झाला, ज्यामुळे Paytm, Google Pay, PhonePe आदी अनेक पेमेंट प्लॅटफॉर्मवरील युजर्संना त्याचा फटका बसला. अधिकृत पोस्टनुसार, NPCI अचानक आलेल्या 'तांत्रिक समस्ये'चे निराकरण करण्यासाठी काम करत आहे, अशी माहिती स्वत: नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) दिली आहे.
मागील ३० दिवसांत तिसऱ्यांदा यूपीआय (UPI) सेवा ठप्प झाली. आज पुन्हा एकदा युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI) डाऊन झाले. या सेवेमध्ये व्यत्यय आला. भारतातील अनेक युपीआय युजर्संना आज (दि.१२) डिजिटल पेमेंट्स करताना अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी सोशल मीडियावर नोंदवल्या. दरम्यान, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) या समस्येला दुजोरा दिला आहे. तसेच तांत्रिक अडचणींमुळे ही समस्या निर्माण झाल्याचे म्हटले आहे.
नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (NPCI) सोशल मीडिया एक्सवर पोस्ट केली आहे. यामध्ये म्हटले आहे की, NPCI सध्या अधूनमधून तांत्रिक समस्यांना तोंड देत आहे, ज्यामुळे UPI व्यवहारांमध्ये अंशतः घट होत आहे. आम्ही ही समस्या सोडवण्यासाठी काम करत आहोत आणि तुम्हाला अपडेट देत राहू. झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीरी व्यक्त करत असल्याचेदेखील NPCIने स्पष्ट केले.