

Smart internet usage tips and Data saving tips for Android users
डिजीटल युगात डेटा वाचवणं म्हणजे जणू पैसे वाचवण्यासारखेच आहे. स्मार्टफोन आणि इंटरनेटचा वापर आज आपल्या दैनंदिन आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, अनेक वेळा इंटरनेट डेटा कमी कालावधीतच संपून जातो आणि त्याचा फटका खिशाला बसतो. अशावेळी जर आपण काही स्मार्ट उपाय अवलंबले, तर डेटा सहज वाचवता येऊ शकतो.
आजच्या काळात, स्मार्टफोनचा वापर फक्त कॉलिंगपुरता मर्यादित नाही, तर आज या उपकरणाद्वारे स्ट्रीमिंग, गेमिंग, सोशल मीडिया आणि ऑनलाइन मीटिंगपासून ते ब्राउझिंगपर्यंत अनेक कामे केली जातात. अशा परिस्थितीत, अनेक इटरनेट युजर्स तक्रार करतात की, त्यांचा डेटा खूप लवकर संपतो. तुम्हालाही अशाच प्रकारची समस्या सतावतेय का? तर आता अजिबात काळजी करू नका. आज आम्ही तुमच्यासोबत अशा भन्नाट टिप्स शेअर करणार आहोत, ज्यांचा अवलंब करून तुम्ही तुमचा डेटा बऱ्याच प्रमाणात वाचवू शकता. तसेच कोणत्याही तणावाशिवाय दिवसभर इंटरनेटचा आनंद देखील घेऊ शकता.
हे पाच उपाय नियमितपणे अमलात आणल्यास तुम्ही तुमचा इंटरनेट डेटा अधिक काळ वापरू शकता आणि अनावश्यक खर्च टाळू शकता
बहुतेक अँड्रॉइड आणि iOS डिव्हाइसेसमध्ये ‘डेटा सेव्हर’ मोड असतो. हा मोड ऑन केल्यास बॅकग्राउंडमध्ये चालणारे अॅप्स इंटरनेट वापरणं थांबवतात, ज्यामुळे अनावश्यक खर्च होणारा डेटा वाचवता येतो.
प्लेस्टोअर किंवा अॅप स्टोअरमध्ये अॅप्स ऑटोमॅटिक अपडेट होतात. यामुळे डेटा खूप खर्च होतो. सेटिंगमध्ये जाऊन “Auto-update apps over Wi-Fi only” हा पर्याय निवडा. त्यामुळे हे अपडेट्स फक्त Wi-Fi वापरताना होतील.
Facebook, Instagram आणि YouTube सारख्या अॅप्सवर व्हिडिओज आपोआप सुरू होतात. हे टाळण्यासाठी 'Auto-play' सेटिंग बंद करा. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर डेटा वाचतो. तुम्ही फक्त इच्छित व्हिडिओजच बघाल आणि डेटा वाचवता येईल.
सामान्य अॅप्सपेक्षा ‘Lite’ व्हर्जन अॅप्स डेटा आणि स्टोरेज दोन्ही कमी वापरतात. त्यामुळे Facebook Lite, YouTube Go, Gmail Go यासारख्या अॅप्स लाइट व्हर्जनमध्ये डेटा कमी वापरला जातो. तसेच हे अॅप्स कमी जागा देखील घेतात आणि डेटा देखील वाचवतात, त्यामुळे हे अॅप डाऊनलोड करून यांचा वापर करा.
Spotify, YouTube Premium किंवा Netflix सारख्या अॅप्समध्ये तुम्ही कंटेंट आधी डाउनलोड करून ऑफलाइन पाहू शकता. त्यामुळे सतत इंटरनेट वापरण्याची गरज राहत नाही आणि डेटा वाचतो.