Samsung Galaxy M35 5G | सॅमसंगचा धमाकेदार नवीन बजेट फोन लाँच, जाणून घ्या फिचर्स आणि किंमत

Samsung Galaxy M35 5G | दणकट आणि पॉवरफूल मोबाईल
Samsung Galaxy M35 5G
सॅमसंगने भारतात सर्वसामान्यांना परवडेल असा बजेटमधील Samsung Galaxy M35 5G फोन लाँच केला आहे.PUDHARI
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : सॅमसंगने भारतात सर्वसामान्यांना परवडेल असा बजेटमधील Samsung Galaxy M35 5G फोन लाँच केला आहे. हा फोन आंतरराष्ट्रीय बाजारात यापूर्वीच उपलब्ध असून आता भारतीय ग्राहकांसाठी तो उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. या फोनची किंमत जरी कमी असली तरी यात अतिशय पॉवरफूल फिचर्स देण्यात आले आहेत.

Samsung Galaxy M35 5G काय आहेत फिचर्स?

हा फोन अगदी स्लीक असून यात Exynos 1380 SOC हा शक्तिशाली प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 6000mAh क्षमतेची बॅटरी, 120 Hz FHD+ sAmoled डिसप्ले, कॉर्निंग गोरिला ग्लास असे काही उत्तम फिचर्स आहेत. या मोबाईल फोनमध्ये व्हेपर चेंबर कुलिंग देण्यात आले आहे. तसेच चार OS अपग्रेडही मिळणार आहेत. (Samsung Galaxy M35 5G)

डिझाईन

हो फोन 6.6 इंच फुल एचडी + सुपर अॅमोलेड डिस्पेल असे याचे डिझाईन आहे. तर रिझोल्यूशन 1080X2340 असे देण्यात आले आहे. स्क्रीन रिफ्रेश रेट हा 120 Hz इतका चांगला आहे, त्यामुळे स्क्रोलिंग अगदी सहज झालेले आहे. शिवाय 1000 NITS चा पिक ब्राईटनेस दिलेला असल्याने थेट सूर्यप्रकाशातही स्क्रीन स्पष्ट दिसणार आहे. शिवाय Gorilla Glass Victus + ची सुरक्षा दिलेली असल्याने स्क्रॅच, किंवा फोन हातातून पडला तरी स्क्रीनचे चांगल्या पैकी संरक्षण होते.

Samsung Galaxy M35 5G
मोबाईल कॉल दरवाढीला केंद्र सरकार जबाबदार: काँग्रेस संतप्त

Samsung Galaxy M35 5Gची कार्यक्षमता आणि बॅटरी

हा फोन Exynos 1380 चीपसेट आणि Mali-G68 GPU ग्राफिक्स असा आहे. तर फोनमध्ये 8 जीबीची RAM आणि 256 GBचे इंटरनस्टोरेज देण्यात आले आहे. स्टोरेजची क्षमता 1 टीबीपर्यंत वाढवता येते.

या फोनमध्ये 6000mAhची बॅटरी देण्यात आलेली असून सोबत 25Wचे फास्ट चार्जिंगही असेल.

सॅमसंग M35 5Gचा पॉवरफूल कॅमेरा

या फोनच्या मागील बाजूला ट्रिपल कॅमेरा देण्यात आला आहे. कॅमेऱ्यामध्ये 50MPचा प्रायमरी सेन्सर, f/1.8 अॅपरेचर, आणि ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन, 8MP अल्ट्रा वाईड अँगल लेन्स इत्यादी क्षमता आहेत. तर पुढील बाजूला सेल्फी घेण्यासाठी 13MPचा कॅमेरा देण्यात आला आहे.

Samsung Galaxy M35 5G मध्ये स्टेरिओ स्पिकर, फिंगर प्रिंट सेन्सर, वायफाय, ब्लू टुथ, जीपीएस, एनएफसी, युसीबी सी टाईप पोर्ट देण्यात आलेले आहेत.

Samsung Galaxy M35 5G
जुलैपासून मोबाईल बिल महागणार !

सॅमसंग M35 5G चे सॉफ्टवेअर

हा फोन अँड्रॉईड १४वर आधारित आहे. या फोनसोबत ५ वर्षांसाठी सिक्युरिटी पॅच आणि ४ ओएस अपग्रेड मिळणार आहेत.

सॅमसंग M35 5Gची किंमत किती?

या फोनची किंमत १५,९९९ रुपयांपासून सुरू होत आहे. हा फोन अॅमेझॉनवर १७ जुलैपासून उपलब्ध झाला आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news