जुलैपासून मोबाईल बिल महागणार !

काय आहे कारण?
mobile recharge price hike
जुलैपासून मोबाईल बिल महागणार !File Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली :देशातील दोन बलाढ्य कंपन्यांनी पाठोपाठ बिलदरवाढ केल्याने जुलै महिन्यापासून मोबाईल बिल वाढणार आहे. टेलिकॉम कंपन्यांनी ५-जी वर केलेली गुंतवणूक, त्या तुलनेत स्थिर असलेले दरडोई उत्पन्न यामुळे मोबाईल दरात वाढ करण्यात आली आहे.

JIO प्लॅन १२ ते २५ टक्के, Airtel प्लॅन १० ते २१ टक्क्यांनी वाढणार

सर्वांत मोठी ग्राहकसंख्या असलेल्या जिओने विविध प्लॅनमध्ये १२ ते २५ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. पाठोपाठ एअरटेलने विविध प्लॅनमध्ये १० ते २१ टक्के दरवाढ जाहीर केली.

mobile recharge price hike
Mobile Addiction : मोबाईल देत आहे मुलांच्या चष्म्याला आमंत्रण

अमर्यादित व्हॉईस प्लॅन्सच्या किमतींमध्ये ११ टक्क्यांची वाढ

एअरटेलने अमर्यादित व्हॉईस आणि दैनंदिन डेटा प्लॅनमध्ये दर समायोजित केले आहेत. अमर्यादित व्हॉईस प्लॅन्सच्या किमतींमध्ये ११ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्याचे दर १७९ ते १९९, ४५५ ते ५०९ आणि १,७९९ ते १,९९९ पर्यंत असतील. दैनंदिन डेटा प्लॅन श्रेणीमध्ये ४७९ रुपयांच्या प्लॅनची किंमत ५७९ रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही वाढ २०.८ टक्के आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news