OPPO 5G Smartphone : 8000 mAh बॅटरी आणि आर्मर्ड बॉडीची ताकद; oppo चा 'हा' नवा ५जी स्मार्टफोन ठरतोय चर्चेचा विषय

फोनमध्ये अत्यंत मजबूत अशी आर्मर्ड बॉडी
OPPO 5G Smartphone
Published on
Updated on

मुंबई : स्मार्टफोन जगतात आघाडीवर असणाऱ्या ओप्पो कंपनीच्या 'K14' मालिकेत आणखी एका नव्या 5जी स्मार्टफोनची भर पडणार आहे. कंपनीने आपल्या या मध्यम बजेटमधील Oppo K14 Plus या स्मार्टफोनच्या भारतातील पदार्पणाची अधिकृत तारीख जाहीर केली आहे. हा नवा हँडसेट येत्या 29 सप्टेंबर रोजी भारतीय बाजारपेठेत दुपारी 12 वाजता अधिकृतरीत्या लाँच होईल. यापूर्वी कंपनीने याच मालिकेत 'oppo K14', 'oppo K14' आणि नुकताच 'oppo K14 lite' हा फोन बाजारात आणला आहे.

कंपनीने या आगामी स्मार्टफोनचे अनेक वैशिष्ट्यपूर्ण तपशील जाहीर केले असून, ई-कॉमर्स संकेतस्थळ 'फ्लिपकार्ट'वर यासाठी स्वतंत्र मायक्रो पेज तयार करण्यात आले आहे. या फोनमध्ये अत्यंत मजबूत अशी आर्मर्ड बॉडी देण्यात आली असून तो नारंगी (Orange) आणि पांढऱ्या (White) अशा दोन आकर्षक रंगांच्या पर्यायांत उपलब्ध होणार असल्याचे टीझरमधून स्पष्ट झाले आहे.

OPPO 5G Smartphone
E-Commerce Rules | सवलतींच्या भुलभुलैयाला लगाम

तांत्रिक वैशिष्ट्यांचा विचार करता, या स्मार्टफोनमध्ये 1.5 K क्षमतेचा एमोलेड (AMOLED) डिस्प्ले देण्यात आला असून तो 144 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 3600 निट्सच्या कमाल पीक ब्राईटनेसला सपोर्ट करेल. दमदार कामगिरीसाठी या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 7360 मॅक्स (MediaTek Dimensity 7360 Max) प्रोसेसर देण्यात आला आहे. फोन अतिउष्ण होऊ नये यासाठी 5000 चौरस मिमी क्षमतेची वेपर चेंबर कूलिंग सिस्टीम यात समाविष्ट करण्यात आली आहे. छायाचित्रणासाठी यात 50 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा उपलब्ध असेल.

या स्मार्टफोनचे सर्वात प्रमुख आकर्षण म्हणजे यातील तब्बल 8000 mAh क्षमतेची अफाट बॅटरी बॅकअप प्रणाली होय. याव्यतिरिक्त, कंपनी ग्राहकांना फोनसाठी तब्बल 6 वर्षांचे संरक्षण आणि डॅमेज-प्रूफ प्रोटेक्शन देणार आहे.

OPPO 5G Smartphone
AI Warning | ‘एआय’च्या इशार्‍यांमागचे खरे इंगित काय?

सुरक्षेच्या दृष्टीने फोनला IP69K रेटिंग देण्यात आली आहे, ज्यामुळे पाणी आणि धूळ-मातीपासून फोनचे संपूर्ण रक्षण होईल. सुरक्षिततेसाठी यामध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर उपलब्ध असून हा स्मार्टफोन 'अँड्रॉइड 16'वर आधारित 'कलरओएस 16' प्रणालीवर कार्य करेल. यासोबतच दैनंदिन वापर सुलभ करण्यासाठी आधुनिक एआय फीचर्सची जोडही या फोनला देण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news