Nothing Phone 3 आज होणार लॉन्च, थेट Samsung, Apple, Googleसारख्या ब्रँड्सना देणार टक्कर
Nothing Phone 3 global launch soon
नवी दिल्ली : पारदर्शक डिझाइन आणि हटके फीचर्समुळे अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या नथिंग ब्रँडचा नवा फ्लॅगशिप स्मार्टफोन, Nothing Phone 3, आज (दि.१) सायंकाळी भारतीय आणि जागतिक बाजारात दाखल होत आहे. कंपनीचा हा पहिला ‘ट्रू फ्लॅगशिप’ फोन असल्याचे म्हटले जात असून, लॉन्चपूर्वीच याच्या किंमती आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल जोरदार चर्चा सुरू झाली आहे. या फोनसोबतच कंपनी Headphone 1 देखील लॉन्च करणार आहे.
सॅमसंग, ॲपल आणि गूगलसोबत करणार थेट स्पर्धा
लॉन्च इव्हेंटपूर्वीच कंपनीने प्रोसेसर आणि कॅमेरासारखे अनेक महत्त्वाचे तपशील उघड केले आहेत, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. चला तर मग जाणून घेऊया या बहुप्रतिक्षित फोनमध्ये काय खास असणार आहे. हा स्मार्टफोन लॉन्च होताच प्रसिद्ध ब्रँन्ड सॅमसंग, ॲपल आणि गूगलसोबत थेट स्पर्धा करणार आहे.
Nothing Phone 3ची भारतातील किंमत कमी असणार
Nothing Phone 3 च्या अधिकृत किंमतीचा खुलासा अद्याप झालेला नाही. मात्र, कंपनीचे सीईओ कार्ल पेई (Carl Pei) यांनी दिलेल्या संकेतांनुसार, हा फोन प्रीमियम सेगमेंटमध्ये येणार आहे. याची किंमत सुमारे ८०० पाऊंड (अंदाजे ९०,००० रुपये) असू शकते. ही किंमत सध्याच्या Nothing Phone 2 च्या तुलनेत (जो भारतात ४४,९९९ रुपयांना लॉन्च झाला होता) जवळपास दुप्पट आहे. तथापि, युरोपीय बाजाराच्या तुलनेत कंपनी भारतीय बाजारात आपले फोन सहसा कमी किंमतीत लॉन्च करते, त्यामुळे भारतातील किंमत कमी असण्याची शक्यता आहे.
'हे' आहेत दमदार फीचर्स
लाँच इव्हेंटमध्ये जाहीर केल्याप्रमाणे, Nothing Phone 3 मध्ये अनेक अत्याधुनिक फीचर्स देण्यात आले आहेत:
प्रोसेसर : फोनमध्ये Snapdragon 8s Gen 4 हा नवीन आणि अत्यंत शक्तिशाली प्रोसेसर वापरण्यात आला आहे, जो हाय-एंड गेमिंग आणि मल्टीटास्किंगसाठी सर्वोत्तम अनुभव देतो.
कॅमेरा : फोटोग्राफीच्या शौकिनांसाठी यात 50MP + 50MP + 50MP असा ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात प्रायमरी सेन्सर, वाईड अँगल लेन्स आणि एक पेरिस्कोप सेन्सर समाविष्ट आहे, ज्यामुळे उत्कृष्ट फोटो आणि व्हिडिओ काढता येतात.
डिस्प्ले : फोनमध्ये 6.7 इंचाचा 1.5K रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेट असलेला शानदार LTPO OLED डिस्प्ले आहे.
बॅटरी : यामध्ये 5150mAh क्षमतेची मोठी बॅटरी असून, ती 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. त्यामुळे काही मिनिटांतच फोन पूर्ण चार्ज होऊ शकतो.
सॉफ्टवेअर : कंपनीने या फोनसाठी 5 वर्षांचे अँड्रॉइड ओएस अपडेट आणि 7 वर्षांचे सिक्योरिटी अपडेट देण्याचे वचन दिले आहे, जे युजर्संसाठी एक मोठा प्लस पॉइंट आहे.
डिझाइनमधील बदल : सर्वात मोठा बदल म्हणजे, फोनमधील प्रसिद्ध Glyph इंटरफेस बदलून त्याजागी अधिक आकर्षक आणि फंक्शनल Glyph Matrix देण्यात आले आहे.

