

तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठी घडामोड म्हणून रिलायन्स जिओने टेक गूगलसोबत मोठी भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारीमुळे जिओच्या 48.27 कोटी ग्राहकांना 18 महिन्यांसाठी Gemini 2.5 AI Pro हे अत्याधुनिक आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मॉडेल पूर्णपणे मोफत वापरता येणार आहे.
या घोषणेमुळे भारतीय तंत्रज्ञान क्षेत्रात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे, कारण काही दिवसांपूर्वीच ओपनएआयने 4 नोव्हेंबर 2025 पासून भारतातील सर्व युजर्ससाठी ChatGPT Go मोफत देण्याची घोषणा केली आहे. तसेच, एअरटेलनेही या वर्षाच्या सुरुवातीला Perplexity AI सोबत भागीदारी केली होती.
रिलायन्स जिओ आणि गूगल यांच्या संयुक्त प्रयत्नातून AI सुविधा प्रत्येक भारतीयांपर्यंत पोहोचवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. जिओ युजर्सना 18 महिन्यांसाठी 'जेमिनी प्रो एआय' मॉडेल मोफत मिळणार आहे.
Gemini Pro AI चे फायदे:
हे एक मल्टीमोडल AI मॉडेल आहे, जे विविध इनपुट समजून घेऊन त्यावर आधारित तर्क करू शकते.
यामध्ये Gemini 2.5 Pro चा ॲक्सेस मिळतो.
नॅनो बनाना आणि Veo 3.1 मॉडेल्स वापरून उत्कृष्ट चित्रे आणि व्हिडिओ तयार करण्यासाठी जास्त मर्यादा मिळतात.
अभ्यास आणि संशोधनासाठी नोटबुक एलएम चा विस्तारित ॲक्सेस.
यासोबतच 2 टीबी (TB) क्लाउड स्टोरेज देखील मिळणार आहे.
सध्या ही ऑफर MyJio ॲपद्वारे सर्व जिओ ग्राहकांसाठी उपलब्ध असेल, परंतु ती टप्प्याटप्प्याने सुरू केली जाईल:
सुरुवातीला ही मोफत सुविधा 18 ते 25 वयोगटातील जिओ युजर्ससाठी उपलब्ध असेल.
यानंतर लवकरच ही सुविधा इतर जिओ ग्राहकांनाही उपलब्ध करून दिली जाईल.
जिओ युजर्स MyJio ॲपद्वारे या मोफत AI मॉडेलचा ॲक्सेस मिळवू शकतील.
रिलायन्सने जाहीर केले आहे की, त्यांची 'रिलायन्स इंटेलिजन्स' ही शाखा जेमिनी एंटरप्राइजमध्ये स्वतःचे एंटरप्राइज एआय एजंट्स विकसित करेल आणि देईल. यामुळे गूगल-निर्मित आणि थर्ड-पार्टी एआय एजंट्स निवडण्याचा पर्याय ग्राहकांना मिळणार आहे.
मुकेश अंबानी (अध्यक्ष, रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड) म्हणाले: "रिलायन्स इंटेलिजन्सचे उद्दिष्ट 1.45 अब्ज भारतीयांना बुद्धिमत्ता सेवा उपलब्ध करून देणे आहे. गूगलसारख्या धोरणात्मक भागीदारासोबत काम करून, भारताला केवळ AI सक्षम नव्हे, तर AI सशक्त बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे. जेणेकरून प्रत्येक नागरिक आणि उद्योग नवीन कल्पना, निर्मिती आणि प्रगती करू शकेल.”
सुंदर पिचाई (सीईओ, गूगल आणि अल्फाबेट) म्हणाले: "जिओसोबत भागीदारी करून आम्ही AI युगात प्रवेश करत आहोत. आजच्या घोषणेमुळे गूगलची अत्याधुनिक AI साधने ग्राहक, व्यवसाय आणि भारतातील विकसक समुदायाच्या हाती येतील. या भागीदारीमुळे संपूर्ण भारतात AI चा ॲक्सेस वाढेल."