RailOne App: भारतीय रेल्वेचे 'RailOne' सुपर ॲप; R-Wallet ने बुकिंग केल्यास मिळणार 'इतकी' सूट, जाणून घ्या याविषयी

आता अनेक ॲप वापरण्याची गरज संपली, ऑल-इन-वन सर्व सेवा उपलब्ध
RailOne App
RailOne AppPudhari Photo
Published on
Updated on

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी 'RailOne' नावाचे एक नवीन 'ऑल-इन-वन' मोबाईल ॲप्लिकेशन सादर केले आहे. या ॲपद्वारे तिकीट बुकिंगपासून ते रिफंड मिळवण्यापर्यंतच्या अनेक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध होणार आहेत. विशेष म्हणजे, या ॲपमधील 'R-Wallet' वापरून तिकीट काढल्यास प्रवाशांना आकर्षक सवलतही मिळणार आहे.

काय आहे 'RailOne' ॲप?

'RailOne' हे भारतीय रेल्वेचे एक नवीन 'सुपर ॲप' आहे. रेल्वेच्या विविध सेवांसाठी आतापर्यंत प्रवाशांना 'Rail Connect', 'UTS' आणि 'Rail Madad' यांसारखी वेगवेगळी ॲप्स वापरावी लागत होती. आता या सर्व ॲप्समधील महत्त्वाच्या सुविधा 'RailOne' मध्ये एकत्र करण्यात आल्या आहेत. यामुळे प्रवाशांना वेगवेगळ्या ॲप्स वापरण्याची गरज भासणार नाही आणि त्यांचा अनुभव अधिक सुलभ होईल. हे ॲप अँड्रॉइड (Android) आणि आयओएस (iOS) या दोन्ही प्रणालींवर उपलब्ध आहे.

तिकीट बुकिंगवर मिळणार  खास सवलत

या ॲपमध्ये 'R-Wallet' नावाची डिजिटल वॉलेट सुविधा देण्यात आली आहे. या वॉलेटचा वापर करून आरक्षित (Reserved), अनारक्षित (General) आणि प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करता येते. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, 'R-Wallet' द्वारे अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी केल्यास प्रवाशांना ३% पर्यंत सवलत (Discount) मिळेल. यामुळे प्रवाशांच्या पैशांची बचत होण्यास मदत होणार आहे.

'RailOne' ॲपची वैशिष्ट्ये

आरक्षित (Reserved) आणि अनारक्षित (Unreserved) तिकीट बुकिंगची सोय.

ॲपद्वारे थेट प्लॅटफॉर्म तिकीट काढण्याची सुविधा.

PNR स्टेटस सहजपणे तपासता येतो.

स्टेशनवर ट्रेनच्या डब्यांची स्थिती (Coach Position) तपासता येते.

मालवाहतूक (Freight) आणि पार्सल सेवेशी संबंधित माहिती उपलब्ध.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news