आता PF बॅलन्स चेक करणे झाले सोपे, फक्त एका मिस्ड कॉलवर मिळवा संपूर्ण माहिती

epfo balance check number: इंटरनेटची गरज नाही, ॲप डाउनलोड करण्याचे टेन्शन नाही; EPFO च्या मोफत सुविधेमुळे मिनिटांत मिळेल अपडेट
epfo balance check number
epfo balance check numberPudhari Photo
Published on
Updated on

टेक न्यूज: देशातील कोट्यवधी नोकरदार वर्गासाठी भविष्य निर्वाह निधी (PF) हा त्यांच्या कष्टाच्या कमाईचा आणि भविष्याचा एक महत्त्वाचा आधार असतो. दरमहा पगारातून कापली जाणारी ही रक्कम हळूहळू मोठी बचत बनते. पण अनेकदा आपल्या खात्यात नेमकी किती रक्कम जमा झाली आहे, हे तपासणे अनेकांना किचकट वाटते.

epfo balance check number
ELI Scheme Epfo: पहिल्या नोकरीवर मिळणार 15 हजार रुपये, मोदी सरकारने आणलेली योजना काय, लाभ कसा मिळणार?

बहुतेकजण पीएफ बॅलन्स तपासण्यासाठी ऑनलाइन पोर्टल किंवा मोबाईल ॲप्सचा वापर करतात. पण तुम्हाला माहित आहे का, की इंटरनेट किंवा स्मार्टफोनशिवायही तुम्ही तुमच्या पीएफ खात्यातील शिल्लक रक्कम तपासू शकता? होय, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) केवळ एका मिस्ड कॉलद्वारे ही माहिती मिळवण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे. ही सेवा पूर्णपणे मोफत आणि अत्यंत सोपी आहे. ही सुविधा विशेषतः अशा लोकांसाठी खूप फायदेशीर आहे, ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही किंवा जे इंटरनेट वापरण्यास सराईत नाहीत. EPFO च्या या सोप्या आणि मोफत सेवेमुळे प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या बचतीवर सहज लक्ष ठेवता येणार आहे.

epfo balance check number
EPFO : पीएफ खात्यातून आता 5 लाखांपर्यंत रक्कम मिळणार

मिस्ड कॉलद्वारे असा तपासा PF बॅलन्स?

  • तुमच्या UAN सोबत नोंदणीकृत असलेल्या मोबाईल नंबरवरून 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या.

  • कॉल केल्यानंतर काही सेकंदात तो आपोआप कट होईल.

  • त्यानंतर लगेचच EPFO कडून तुमच्या मोबाईलवर एक SMS येईल.

  • या SMS मध्ये तुमच्या पीएफ खात्यातील एकूण जमा रक्कम आणि शेवटच्या योगदानाची (Last Contribution) सविस्तर माहिती दिलेली असेल.

epfo balance check number
EPFO मधील 'हे' ५ मोठे बदल तुमच्या बचतीवर करतील थेट परिणाम

'ही' सुविधा वापरण्यासाठी काय आवश्यक आहे?

  • या अत्यंत उपयुक्त सेवेचा लाभ घेण्यासाठी एक महत्त्वाची अट आहे, ज्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

  • तुमचा मोबाईल नंबर तुमच्या UAN (युनिव्हर्सल अकाउंट नंबर) शी लिंक असणे अनिवार्य आहे.

  • त्याचबरोबर, तुमची KYC प्रक्रिया देखील पूर्ण झालेली असावी.

  • जर तुमचा मोबाईल नंबर UANशी लिंक नसेल, तर तुम्ही या मोफत सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाही. त्यामुळे, लवकरात लवकर तुमच्या कंपनीमार्फत किंवा ऑनलाइन पोर्टलवरून ते अपडेट करून घ्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news