Aadhaar Card एक्सपायर होते का? 'या' सोप्या पद्धतीने घरबसल्या तपासा तुमच्या 'आधार'ची व्हॅलिडिटी

UIDAI च्या वेबसाइटवर उपलब्ध आहे खास पर्याय; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया
Aadhaar Card
Aadhaar CardFile Photo
Published on
Updated on

Aadhaar card validity News

नवी दिल्ली: ज्याप्रकारे ATMला एक्सपायरी डेट असते, त्याप्रमाणे Aadhaar Card ला असते का?, आपल्या आधार कार्डची मुदत (Validity) कधी संपणार, ते एक्सपायर तर होणार नाही ना, असे अनेक प्रश्न नागरिकांना पडतात. आधार कार्ड हे आजच्या काळात सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र बनले आहे. बँकेपासून ते सरकारी योजनांपर्यंत सर्व ठिकाणी त्याची गरज भासते. पण तुम्हाला माहिती आहे का, की तुम्ही तुमच्या आधार कार्डची वैधता अगदी सोप्या पद्धतीने ऑनलाइन तपासू शकता?

UIDAI च्या https://uidai.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर आधार कार्ड अपडेट करण्यापासून ते इतर अनेक महत्त्वाच्या सेवा उपलब्ध आहेत. याच सेवांपैकी एक म्हणजे 'आधार व्हॅलिडिटी' तपासण्याची सुविधा. चला तर मग, जाणून घेऊया की आधार कार्ड खरंच एक्सपायर होतं का आणि त्याची वैधता कशी तपासायची.

Aadhaar Card
Aadhaar Card Instant Loan | आता आधार कार्डवर मिळणार झटपट कर्ज, असा करा ऑनलाइन अर्ज

आधार कार्ड खरंच एक्सपायर होतं का?

सर्वात आधी एक गोष्ट स्पष्ट करणे महत्त्वाचे आहे. अनेकांना वाटते की, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पासपोर्टप्रमाणे आधार कार्डची सुद्धा एक ठराविक मुदत असते आणि त्यानंतर ते एक्सपायर होते. पण तसे अजिबात नाही. एकदा बनवलेले आधार कार्ड हे आयुष्यभरासाठी वैध (Valid) असते. तुम्ही त्यावरील पत्ता किंवा नाव यासारखी माहिती आवश्यकतेनुसार बदलू शकता, पण तुमचा आधार क्रमांक आणि कार्ड तेच राहते.

मग 'Check Aadhaar Validity' पर्यायाचा अर्थ काय?

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, जर आधार कार्ड आयुष्यभरासाठी वैध असेल, तर UIDAI च्या वेबसाइटवर 'Check Aadhaar Validity' (आधार वैधता तपासा) हा पर्याय का दिला आहे? तर, इथे 'व्हॅलिडिटी' या शब्दाचा अर्थ मुदत संपण्याशी नसून, तुमचा आधार क्रमांक 'वैध' म्हणजेच 'अस्तित्वात' आहे की नाही, हे तपासण्याशी आहे. जेव्हा तुम्ही या पर्यायाचा वापर करता, तेव्हा तुम्ही टाकलेला आधार क्रमांक खरा आहे की नाही हे सिस्टीम तपासते. जर क्रमांक योग्य असेल, तर स्क्रीनवर 'Aadhaar number Exists' असा संदेश दिसतो. या पर्यायाचा मुख्य उद्देश हाच आहे की दिलेला आधार क्रमांक बनावट नाही ना, हे तपासणे.

Aadhaar Card
Aadhaar Update : ... तर १० वर्ष जुने आधार कार्ड रद्द होणार; सरकारचा मोठा निर्णय

अशी तपासा तुमच्या Aadhaar कार्डची व्हॅलिडिटी:

तुम्ही खालील सोप्या स्टेप्स वापरून तुमच्या किंवा इतर कोणाच्याही आधार कार्डची वैधता तपासू शकता.

  • सर्वात आधी UIDAI च्या https://uidai.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा.

  • वेबसाइटच्या होम पेजवर 'My Aadhaar' या सेक्शनवर क्लिक करा.

  • आता 'Aadhaar Services' या पर्यायावर जा.

  • येथे तुम्हाला 'Check Aadhaar Validity' हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.

  • आता उघडलेल्या नवीन पेजवर तुमचा १२ अंकी आधार क्रमांक आणि दिलेला कॅप्चा कोड टाका.

  • यानंतर 'Submit' बटणावर क्लिक करताच तुमच्या आधार कार्डच्या वैधतेची माहिती स्क्रीनवर दिसेल.

स्क्रीनवर काय दिसेल?

ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमच्या आधार कार्डची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसत नाही. सुरक्षेच्या कारणास्तव, फक्त काही मर्यादित तपशील दाखवले जातात. यामध्ये तुमचा वयोगट (उदा. २०-३० वर्षे), तुमचे लिंग (स्त्री/पुरुष), राज्य तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरचे शेवटचे तीन अंक या सोप्या पद्धतीमुळे तुम्हाला कोणी चुकीचा किंवा बनावट आधार क्रमांक दिल्यास तो लगेच ओळखता येतो आणि समोरच्या व्यक्तीला याचा कोणताही सुगावा लागत नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news