Gmail Username: Kool, cute...@ असले ईमेल आयडी आता बदलता येणार; गुगल युजर्सना दिलासा, जाणून घ्या प्रोसेस

how to change gmail id username: Google ने Gmail युजरनेम बदलण्याची नवी सुविधा सुरू केली आहे. आता युजर्स जुना ईमेल आयडी बदलून नवीन आयडी वापरू शकतात.
Gmail Username Change
Gmail Username ChangePudhari
Published on
Updated on

how to change gmail id name Explain in marathi:

डिजिटलच्या युगात ईमेल आयडी ही आपली ओळख बनली आहे. पण अनेकांच्या Gmail आयडीमध्ये जुनी नावं, टोपणनावं किंवा अनावश्यक शब्द असतात. आता या समस्येवर तोडगा काढत गुगलने एक महत्त्वाचा बदल केला आहे. या नव्या फीचरमुळे युजर्सना आपला Gmail आयडी (@gmail.com) पूर्णपणे बदलता येणार आहे.

जुन्या आयडीपासून मुक्तता

पूर्वी Gmail आयडी एकदा तयार केल्यानंतर तो बदलणे शक्य नव्हते. मात्र आता युजर्स नवीन ईमेल आयडी निवडू शकतात आणि तरीही त्यांचा जुना डेटा, ईमेल्स आणि सर्व सेवा तशाच राहतील. सुंदर पिचाई यांनीही सोशल मीडियावर याची माहिती देताना सांगितले की, जुन्या आणि कालबाह्य वाटणाऱ्या ईमेल आयडीला आता सहज टाटा बाय-बाय करता येईल.

काय बदलणार?

या अपडेटमुळे Gmail युजर्सना मोठा फायदा होणार आहे.

  • नवीन Gmail आयडी तयार केल्यानंतर जुना आयडी बंद होत नाही

  • जुना आयडी ‘alternate email’ म्हणून वापरता येतो

  • दोन्ही आयडीवर ईमेल्स येत राहतात

  • सर्व डेटा (ईमेल, फोटो, ड्राइव्ह फाइल्स) सुरक्षित राहतो

  • जुन्या किंवा नवीन कोणत्याही आयडीने लॉगिन करता येते

काय काळजी घ्याल?

Google ने काही गोष्टींबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे.

  • नवीन Gmail आयडी तयार केल्यानंतर 12 महिन्यांपर्यंत पुन्हा बदल करता येणार नाही

  • नवीन आयडी डिलीट करता येणार नाही

  • काही अॅप्स किंवा सेटिंग्ज पुन्हा कॉन्फिगर कराव्या लागू शकतात

  • Chromebook, Chrome Remote Desktop किंवा थर्ड पार्टी लॉगिनवर थोडा परिणाम होऊ शकतो

म्हणून महत्त्वाच्या डेटाचा आधी बॅकअप घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Gmail आयडी कसा बदलायचा?

नवीन ईमेल आयडी बदलण्यासाठी खालील प्रक्रिया करावी लागेल:

  1. Google Account सेटिंग्समध्ये जा

  2. “Personal Information” मध्ये ईमेल बदलण्याचा पर्याय तपासा

  3. उपलब्ध नवीन युजरनेम निवडा

  4. ऑन-स्क्रीन स्टेप्स पूर्ण करा

यानंतर नवीन ईमेल आयडी तुमचा मुख्य आयडी बनेल, तर जुना आयडी लिंक राहील.

Google च्या या अपडेटमुळे युजर्सना त्यांची डिजिटल ओळख बदलण्याची मोठी संधी मिळाली आहे. अनेक वर्षांचा डेटा न गमावता Gmail आयडी बदलण्याची ही सुविधा अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आता जुन्या, विचित्र किंवा नकोशा वाटणाऱ्या ईमेल आयडीला टाटा बाय-बाय करून आधुनिक आणि प्रोफेशनल ओळख निर्माण करणे अधिक सोपे होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news