

पुढारी ऑनलाईन डेस्क: Gmail authentication |जीमेल हे गूगल कंपनीने विकसित केलेली एक विनामूल्य ई-मेल सेवा आहे. Google जीमेलसाठी एसएमएस-आधारित टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनसाठी (2FA) सपोर्ट बंद करणार आहे. कंपनी सध्या जीमेल युजर्संना पाठवल्या जाणाऱ्या एसएमएस कोडऐवजी क्विक रिस्पॉन्स (QR) कोडसाठी सपोर्ट सुरू करणार असल्याचे वृत्त आहे.
Google कंपनीने Gmail प्लॅटफॉर्मसंबंधीत उचललेल्या या पावलामुळे गुगल अकाउंट्सची सुरक्षा वाढण्याची अपेक्षा आहे. कारण जीमेल युजर्स जुन्या परंतु अनेक प्लॅटफॉर्मवर समर्थित असलेल्या 2FA सिस्टमद्वारे ऑफर केलेल्या सुरक्षिततेला बायपास करून युजर्संना एसएमएसद्वारे प्राप्त झालेले त्यांचे लॉगिन कोड शेअर करून फसवणूक करू शकतात. SMS च्या (एसएमएस) गैरवापराला आळा घालण्यासाठी जीमेल एसएमएस ऑथेंटिकेशन कोड वगळून त्याठिकाणी क्विक रिस्पॉन्स (QR) कोड आणण्यासाठी प्रयत्नशील आहे.
फोर्ब्सच्या अहवालानुसार, येत्या काही महिन्यांत गुगल त्यांच्या एसएमएस ऑथेंटिकेशन कोडऐवजी क्यूआर कोड आणणार आहे. कंपनी सध्या युजर्संना एसएमएसद्वारे सहा अंकी कोड पाठवते, जो गुगल अकाउंटमध्ये लॉग इन करताना योग्य पासवर्ड दिल्यानंतर प्रविष्ट करावा लागतो. २०११ मध्ये सर्च जायंटने सादर केलेला हा २ एफएचा पहिला प्रकार होता आणि त्यानंतरच्या वर्षांत अधिक सुरक्षित पर्याय सादर केले गेले आहेत.
कंपनीने एसएमएस-आधारित २एफए कोडसाठी समर्थन टप्प्याटप्प्याने बंद केल्यानंतर, जीमेल युजर्संना आता एक क्यूआर कोड सादर केला जाईल. जो त्यांच्या स्मार्टफोनवरील कॅमेरा ॲप वापरून स्कॅन करता येईल. यानंतर Gmail सेवा वापरण्यासाठी प्रवेश करता येईल. योग्य पासवर्ड सबमिट केल्यानंतर हे क्यूआर कोड युजर्ससाठी अधिक सुरक्षित मार्ग प्रदान करेल, असा विश्वास कंपनीने व्यक्त केला आहे.
दोन-स्तरीय प्रमाणीकरण (2FA) ही एक सुरक्षाव्यवस्था आहे जी तुमच्या Gmail खात्याचे संरक्षण करण्यासाठी वापरली जाते. यामध्ये, तुमच्या खात्यात लॉगिन करण्यासाठी केवळ पासवर्ड पुरेसा नसतो, तर एक अतिरिक्त कोड आवश्यक असतो. हा कोड तुम्हाला एसएमएस, कॉल, किंवा ऑथेंटिकेटर अॅपद्वारे मिळतो.
हॅकिंगपासून संरक्षण: पासवर्ड लीक झाला तरी दुसरा कोड असल्यामुळे खाते सुरक्षित राहते.
अतिरिक्त सुरक्षितता: फक्त ओळखीच्या व्यक्तीलाच लॉगिन करता येते.
मोबाइल अॅक्सेस: Google Authenticator अॅप किंवा SMS द्वारे कोड पटकन मिळतो.