

पुढारी ऑनलाईन डेस्क : नुकतेच पती-पत्नी नोएडामधील एका हॉटेलच्या खोलीत थांबले होते, परंतु त्यांच्या खोलीत लावलेल्या छुप्या कॅमेऱ्याने त्यांचे रेकॉर्डिंग सुरूच होते. अशी अनेक प्रकरणे देशात रोज घडत असतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला हॉटेलमध्ये लावलेला छुपा कॅमेरा कसा तपासू शकतो हे सांगणार आहोत. जेणेकरून तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेवू शकाल.
छुपे कॅमेरे कुठे बसवले जातात?
रूममधील फायर अलार्म आणि स्मोक डिटेक्टर नेहमी तपासा कारण येथे बहुतेक कॅमेरे लपलेले असतात. हॉटेलच्या खोलीत बसवलेले आरसे, कपाट आणि वॉशरूम तपासून पहा. यासाठी तुम्हाला टू-वे मिरर टेस्ट करावी लागेल. तुमच्या नखांचे टोक रिफ्लेक्टिव्ह पृष्ठभागावर ठेवावे लागेल आणि जर तुमचे नख आणि नखाच्या प्रतिमेमध्ये काही अंतर दिसले तर सर्व ठीक आहे. मात्र त्याउलट जर तुमची नखे थेट तुमच्या नखाच्या प्रतिमेला स्पर्श करत असेल तर काहीतरी गडबड आहे.
हॉटेलमध्ये टीव्ही आणि सेट-टॉप-बॉक्स देखील तपासला पाहिजे. यातही छुपे कॅमेरे असू शकतात. टीव्हीसमोर पॉवर बटण दिसले तर त्यावर टॉर्च लावा. आजच्या युगात प्रत्येक मोबाईलमध्ये फ्लॅश लाईट आहे. त्यामुळे छुपे कॅमेरे शोधण्यात हा रामबाण उपाय ठरतो. बहुतेक लपविलेल्या कॅमेऱ्यांमध्ये हिरवे किंवा लाल एलईडी दिवे चमकत असतात. त्यामुळे तुम्हाला कॅमेरा शोधण्यासाठी रूम स्कॅन करण्याची आवश्यकता आहे. प्रथम खोलीचे दिवे बंद करावे लागतील. त्यानंतर तुम्हाला स्कॅनिंगसाठी तुमच्या स्मार्टफोनचा LED लाईट चालू करावा लागेल. जर खोलीत छुपा कॅमेरा बसवला तर मोबाईलच्या कॅमेऱ्यावर काही तरी प्रकाश नक्कीच चमकताना दिसेल.
हॉटेल रूममधील पुष्पगुच्छांमध्येही छुपे कॅमेरे असू शकतात. तसेच स्पीकर आणि अलार्म क्लॉकच्या स्पीकर जाळीमध्ये छुपा कॅमेरा सहजपणे सेट केला जाऊ शकतो. याशिवाय कमी टांगणारे घड्याळ, पॉवर प्लग किंवा सॉकेट, कपाटे, पडदे, ड्रॉअर, टॉवेल, हेअर ड्रायर तसेच लॅम्पमधील दिवे यांच्यातही कॅमेरा असण्याची दाट शक्यता असते. म्हणून, हॉटेलच्या खोलीत असलेले सर्व प्रकारचे दिवे आणि तेथील वस्तू तपासून पहा की, तेथे कोणताही छुपा कॅमेरा बसवला आहे का? शंका असल्यास, दिवा बंद करा आणि कापड किंवा टिश्यू पेपरने झाकून टाका.