'ChatGPT'ने ४ दिवसांत बनवल्या ७० कोटी Ghibli इमेजेस; OpenAI ची माहिती

OpenAI ChatGPT | भारत 'ChatGPT' चे सर्वात वेगाने वाढणारे 'मार्केट; सीईओ सॅम ऑल्टमन
openai ceo sam altman announces chatgpt image gen now rolled out to all free users
'ChatGPT'ने ४ दिवसात बनवल्या ७० कोटी Ghibli इमेजेस; OpenAI ची माहितीFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: OpenAI ChatGPT|१ एप्रिलपासून ओपनएआय (OpenAI) कंपनीने Ghibli (घिब्ली) या ट्रेंडची सेवा युजर्संना उपलब्ध करून दिली. यानंतर चारच दिवसांत चॅटजीपीटीवर जवळपास १३ कोटींहून अधिक युजर्संनी ७० कोटींहून अधिक Ghibli (घिब्ली) अ‍ॅनिमी इमेजेस (प्रतिमा) तयार केल्या आहेत, अशी माहिती एआय कंपनी ओपनएआयने (OpenAI) दिली आहे.

ChatGPTसाठी सुरू आठवडा खूपच भन्नाट

भारतातील युजर्सकडून सर्वाधिक Ghibli (घिब्ली) अ‍ॅनिमी इमेजेस बनवण्यात आल्या आहेत. त्यामुळे 'चॅटजीपीटी'साठी सुरू आठवडा खूपच भन्नाट होता, असे ओपनएआय (OpenAI) कंपनीने म्हटले आहे. भारतात 'ChatGPT'चे मार्केट हे अधिक वेगाने वाढत आहे, असेही कंपनीने म्हटले आहे. ओपनएआयचे (OpenAI) सीओओ (COO) ब्रॅड लाइटकॅप यांनी या संदर्भातील माहिती त्यांच्या अधिकृत एक्स सोशल मीडिया अकाऊंटवरून दिली आहे.

भारत AI मध्ये जगाला मागे टाकत आहे; OpenAI सीईओ

ओपनएआयचे (OpenAI) सीईओ (CEO) सॅम आल्टमन यांनी भारतीय लोकांच्या चॅटजीपीटी वापरावरून भारताने AI स्वीकारताना जे घडत आहे ते पाहणे आश्चर्यकारक आहे. भारतीय लोकांच्या सर्जजशीलतेचाहा महापूर पाहताना आम्हाला आनंद वाटत आहे. भारत AI मध्ये जगाला मागे टाकत असल्याचेही सॅम आल्टमन यांनी म्हटले आहे. दरम्यान त्यांनी टीम इंडियाची जर्सी घातलेली क्रिकेट खेळाडू म्हणून स्वतःची एआय-जनरेट केलेली Ghibli (घिब्ली) अ‍ॅनिमी इमेज (प्रतिमा) देखील एक्सवरून शेअर केली आहे.

भारत ChatGPTची सर्वात वेगाने वाढणारी बाजारपेठ

दरम्यान, कंपनीचे सीओओ (COO) ब्रॅड लाइटकॅप यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे की, "चॅटजीपीटी मधील Ghibli (घिब्ली) अ‍ॅनिमी इमेज क्रिएशनसाठी पहिला आठवडा खूपच भन्नाट होता. मंगळवार १ एप्रिलपासून १३ कोटींहून अधिक युजर्संनी ७० कोटींहून अधिक Ghibli (घिब्ली) अ‍ॅनिमी इमेजेस तयार केल्या आहेत. भारत आता आमची सर्वात वेगाने वाढणारी चॅटजीपीटी बाजारपेठ बनली आहे. आम्ही सर्वांना सेवा देण्याचा प्रयत्न करत असताना तुमच्या संयमाचे आम्ही कौतुक करतो, टीम दिवसरात्र काम करत राहते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news