

ChatGPT Palm Reading
सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) हे तंत्रज्ञान प्रचंड वेगाने प्रगत होत असून, ChatGPT सारख्या एआय चॅटबॉट्सने जगभरात मोठी क्रांती घडवून आणली आहे. ChatGPT फक्त प्रश्नांची उत्तरे देणे, लेखन किंवा अनुवाद करणे यापुरते मर्यादित नसून, आता ChatGPT यूजर्स हाताची रेषा (हस्तरेषा) ChatGPT ला दाखवून त्यातून भविष्य वाचण्याचा नवीन आणि मजेशीर ट्रेंड सुरु झाला आहे.
जर तुम्हालाही curiosity असेल, तर खालील पद्धती वापरून तुम्ही हा अनुभव घेऊ शकता:
तुमचा फोटो निवडा आणि अपलोड करा.आश्चर्य वाटेल, पण सोशल मीडियावर असे अनेक व्हिडिओ आणि पोस्ट्स व्हायरल होत आहेत, ज्यात लोक आपल्या हाताचा फोटो ChatGPT ला दाखवत आहेत आणि ChatGPT त्यातून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे किंवा भविष्याचे विश्लेषण करत आहे.
ChatGPT किंवा कोणताही एआय हाताच्या रेषा 'वाचू' शकत नाही. कारण हस्तरेषाविज्ञान (Palmistry) हे एक पारंपरिक, अध्यात्मिक आणि पूर्णपणे मानवी समजुतीवर आधारित शास्त्र आहे. त्यासाठी अनुभवसंपन्न हस्तरेषाविशारदांची गरज असते. मात्र, ChatGPT मध्ये नवीन ‘image input’ फिचर आहे, ज्यामुळे तो फोटोवर आधारित माहिती देऊ शकतो, पण ती केवळ दृश्यात्मक तपशीलांवर आधारित असते.
ही नवी ट्रेंडिंग मजा फक्त मनोरंजनासाठी आणि सोशल मीडियावर मजेशीर कंटेंट तयार करण्यासाठी केली जाते. काही जण ChatGPT ला विचारतात, "माझ्या हाताच्या रेषांवरून माझा स्वभाव कसं आहे?" किंवा "माझं आयुष्य कसं असेल रे?" अशा प्रश्नांना ChatGPT इंटरनेटवर उपलब्ध हस्तरेषाविषयक माहितीवरून अगदी साधी, सर्वसाधारण उत्तरं देतो. पण ऐकायला मजा येईल अशी उत्तरं देतो. ती पण थोडीफार पामिस्ट्रीवर आधारित!
ChatGPT हे एक ताकदवान एआय टूल आहे, पण ते कोणत्याही प्रकारे ज्योतिषशास्त्र, हस्तरेषाविज्ञान यावर आधारित भविष्य सांगू शकत नाही. मात्र, ते त्याविषयीच्या मजेशीर गोष्टी सांगू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला हस्तरेषांबद्दल गंमत वाटत असेल, तर हा एक प्रयोग म्हणून बघा पण त्यावर विश्वास ठेवू नका!