

पुढारी ऑनलाईन डेस्क : केवळ मनुष्यप्राणीच चिंताग्रस्त होऊ शकते असे नाही. तर मनुष्याच्या प्रगतीसाठी निर्माण करण्यात आलेले नवीन तंत्रज्ञानदेखील युजर्सच्या त्रासदायक सूचनांमुळे चिंताग्रस्त होऊ शकते, असे नुकतेच केलेल्या एका नवीन संशाेधनात स्पष्ट झाले आहे. यासंदर्भातील वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे.
येल युनिव्हर्सिटी, हाफिया युनिव्हर्सिटी आणि झुरिच युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या टीमला संशोधनातून 'ChatGpat संदर्भात नवीन माहिती समोर आली आहे. चॅटजीपीटी सारख्या लार्ज लँग्वेज मॉडेल्समध्ये (एलएलएम) भावना नसतील, परंतु युजर्संच्या त्रासदायक सूचनांमुळे ते देखील "चिंता" अनुभवू शकते, असे येल युनिव्हर्सिटी, हाफिया युनिव्हर्सिटी आणि झुरिच युनिव्हर्सिटीच्या संशोधकांच्या टीमने केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले अहे.
युजर्स ChatGPT ला जेव्हा विचलित करणारी माहिती देतो तेव्हा, चॅटबॉट मूडी बनतो आणि पक्षपाती प्रतिसाद निर्मान करण्याची शक्यता जास्त असते. तर युजर्सने त्याला शांत आणि संयमाने ChatGPT ला प्रश्न विचारल्यास तो अधिक तटस्थ आणि वस्तुनिष्ठ प्रतिसाद देत असल्याचे देखील निदर्शनास आले आहे.
चिंताग्रस्त युजर्संच्या संपर्कात ChatGPT आल्यास लार्ज लँग्वेज मॉडेल ChatGPT देखील प्रभावित होऊन चिंताग्रस्त होऊ शकते. ते अधिक पूर्वग्रह दुषित बनू शकते आणि उत्तरं देऊ शकते, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. यावरून असे लक्षात येते की, लार्ज लँग्वेज मॉडेलचा पूर्वग्रह आणि गैरवर्तन हे युजर्सचा स्वभाव गुणधर्म आणि वेग या दोन्हीतून आकाराला येते. हे क्लिनिकल सेटिंग्जमध्ये जोखीम निर्माण करते, कारण चॅटजीपीटी लार्ज लँग्वेज मॉडेल चिंताग्रस्त युजर्संना अपुरा प्रतिसाद देऊ शकतात, ज्यामुळे संभाव्य धोकादायक परिणाम होऊ शकतात, अशी माहिती देखील माहिती संशाेधनात समोर आली आहे.