

BHIM UPI Circle feature latest news update
आता तुमच्या बँक खात्यात पैसे नसले तरी काळजी करण्याची गरज नाही. कारण, तुम्ही अजूनही युनिफाइड पेमेंट्स इंटरफेसद्वारे (UPI) पेमेंट करू शकता. हे शक्य झालं आहे सरकारी डिजिटल पेमेंट ॲप BHIM UPI च्या एका खास सुविधेमुळे, ज्याचं नाव आहे - UPI Circle (यूपीआय सर्कल).
UPI Circle हे BHIM UPI ॲपवर उपलब्ध असलेलं एक नवीन वैशिष्ट्य आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या खात्यातून पेमेंट करण्यासाठी एखाद्या विश्वासू व्यक्तीला (कुटुंबीय किंवा मित्र) परवानगी देऊ शकता. हे फीचर खास करून कुटुंबातील सदस्यांसाठी, वयोवृद्धांसाठी किंवा ज्यांच्याकडे स्वतःचं बँक खाते किंवा UPI ॲक्सेस नाही, अशा लोकांसाठी डिजिटल पेमेंट खूप सोपं करतं.
UPI Circle वापरताना, तुमचा मित्र किंवा कुटुंबातील सदस्य तुमच्या खात्यातून पेमेंट करू शकतो, पण या व्यवहारांवर तुमचं पूर्ण नियंत्रण राहतं.
सुरक्षितता: पेमेंट करणाऱ्या दुसऱ्या व्यक्तीला तुमच्या बँक खात्याची कोणतीही माहिती दिसत नाही.
नियंत्रण: तुम्ही त्या व्यक्तीसाठी दररोजच्या व्यवहाराची मर्यादा (Limit) सेट करू शकता.
मंजुरी आवश्यक: तुम्ही प्रत्येक व्यवहारासाठी तुमची मंजुरी (Approval Required) आवश्यक करण्याचा पर्यायही निवडू शकता.
हे फीचर BHIM UPI ॲपवर उपलब्ध आहे.
BHIM ॲप उघडा आणि आपल्या नोंदणीकृत नंबरने लॉग इन करा.
ॲपच्या होम स्क्रीनवर किंवा मेनूमध्ये “UPI Circle” हे नवीन फीचर दिसेल, त्यावर टॅप करा.
“Add Family or Friends” चा पर्याय निवडून, तुम्ही फोन नंबर, UPI ID किंवा QR कोड स्कॅन करून त्या व्यक्तीला Circle मध्ये जोडू शकता.
मर्यादेसह खर्च (Spend with Limit) : यामध्ये तुम्ही व्यवहाराची मर्यादा (रक्कम आणि वेळ) सेट करू शकता.
मंजुरी आवश्यक(Approval Required): प्रत्येक व्यवहारासाठी तुमची मंजुरी आवश्यक असेल.
सर्व तपशील भरल्यानंतर, UPI PIN टाकून खात्री (Confirm) करा.
आवश्यकतेनुसार तुम्ही त्या व्यक्तीची पेमेंट मर्यादा कधीही बदलू शकता किंवा त्याला Circle मधून काढूनही टाकू शकता.