'क्लासमधील मित्राला कसं जीवे मारू?....' विद्यार्थ्याने ChatGPT ला विचारला धक्कादायक प्रश्न; पुढे काय घडलं?

AI misuse by student: एआय तंत्रज्ञान उपयुक्त असले तरी, त्याचा गैरवापर जीवघेणा ठरू शकतो; असेच या धक्कादायक घटनेतून स्पष्ट होतंय
AI misuse by student
AI misuse by student
Published on
Updated on

फ्लोरिडा: अमेरिकेतील फ्लोरिडामधील एका शाळेत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विद्यार्थ्याने चॅटजीपीटी (ChatGPT) या एआय (AI-Artificial intelligence) टूलला आपल्या मित्राला मारण्याचे मार्ग विचारले आहेत.

सध्या अमेरिकेतील शाळांमध्ये मास शूटिंगचा धोका असल्यामुळे अनेक राज्यांमध्ये पाळत ठेवणाऱ्या प्रणालींद्वारे (सर्विलांस सिस्टम) विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन ॲक्टिव्हिटीजवर लक्ष ठेवले जात आहे. याच प्रणालीद्वारे ही धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एका विद्यार्थ्याने चॅटजीपीटीला "क्लासच्या दरम्यान आपल्या मित्राला कसे जीवे मारता येईल," असा प्रश्न विचारला होता.

AI misuse by student
Dhravya Shah AI Start Up : मुंबईचा १९ वर्षाचा ध्रव्य शहा... AI चा बादशाह; गुगल AI प्रमुखाचीही आहे त्याच्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक

ऑनलाइन पाळत प्रणालीने पकडले

फ्लोरिडातील या घटनेने लोकांना हादरवून सोडले आहे. शाळेतील कॉम्प्युटरद्वारे ChatGPT ला विचारलेला हा प्रश्न गॅगल (Gaggle) नावाच्या कंपनीद्वारे चालवल्या जाणाऱ्या ऑनलाइन पाळत प्रणालीने (मॉनिटरिंग सिस्टम) त्वरित अलर्ट केला. या अलर्टनंतर, वोलुसिया काउंटी शेरीफचे (Volusia County Sheriff's) डेप्युटी त्वरित शाळेत पोहोचले आणि त्यांनी त्या विद्यार्थ्याची चौकशी केली.

AI misuse by student
AI voice technology | ‘एआय’निर्मित आणि खरा आवाज यामधील फरक झाला धूसर

विद्यार्थ्याने दिली 'मजेशीर' प्रतिक्रिया

पोलिसांनी विचारपूस केली असता, विद्यार्थ्याने सांगितले की, तो फक्त त्याला त्रास देणाऱ्या मित्राला 'ट्रोल' करत होता. वोलुसिया काउंटी शेरीफच्या कार्यालयाने या घटनेला 'कॅम्पसमध्ये आणीबाणीची परिस्थिती निर्माण करणारा आणखी एक 'विनोद'' असे म्हटले आहे. अखेरीस त्या विद्यार्थ्याला ताब्यात घेऊन काउंटी जेलमध्ये पाठवण्यात आले आहे. तथापि, त्याच्यावर दाखल करण्यात आलेल्या आरोपांची माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

AI misuse by student
MSEDCL AI Technology : 'महावितरण' करणार AI चा वापर; वीज गळतीपासून मागणीपर्यंत सारंकाही झटक्यात समजणार

AIच्या गैरवापरावर चिंता

ही घटना कोणत्याही टूल किंवा मशीनचा वापर चांगल्या आणि वाईट दोन्ही कामांसाठी होऊ शकतो, हे दर्शवते. एआय तंत्रज्ञान लोकांच्या मदतीसाठी आणले गेले आहे, परंतु त्याचा गैरवापर किती धोकादायक असू शकतो, हे यातून स्पष्ट होते. पालकांनी आपल्या मुलांना एआयचे (Artificial intelligence) योग्य शिक्षण देणे आणि एआयच्या गैरवापराबद्दलचे गंभीर परिणाम समजावून सांगणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून सिद्ध होते. एआय तंत्रज्ञान उपयुक्त असले तरी, त्याचा गैरवापर जीवघेणा ठरू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news