AI temple india: भारताचं 'पहिलं' AI टेंपल ! तिरुपतिमध्ये लवकरच स्मार्ट तंत्रज्ञानाची एंट्री; भाविकांसाठी खास सुविधा

Tirupati temple smart facilities latest news: भाविकांच्या दृष्टीने तिरुपति मंदिरातील दर्शनाचा अनुभव आता सर्व सुविधा अन् अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे.
AI temple india
AI temple india
Published on
Updated on

Artificial intelligence in temples India latest news

आंध्र प्रदेशमधील जगप्रसिद्ध तिरुमला तिरुपति मंदिर लवकरच एका महत्त्वपूर्ण बदलासाठी सज्ज झालं आहे. मंदिरात लवकरच आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाने युक्त असलेले कमांड कंट्रोल सेंटर सुरू केले जाणार आहे. या अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने मंदिरातील भाविकांची गर्दी नियंत्रित करणं अधिक सोपे आणि प्रभावी होईल.

AI temple india
dangers of ‘AI’ | ‘एआय’ धोक्यांचे वस्त्रहरण

भारतातील पहिलाच प्रयोग

तिरुपति मंदिर हे भारतातील कोणत्याही मंदिरात अशा प्रकारचं AI-सज्ज कमांड कंट्रोल सेंटर सुरू करणारं पहिलं मंदिर ठरणार आहे. याच कारणामुळे या मंदिराला 'भारताचं पहिलं AI टेंपल' असं म्हटलं जात आहे. हे नवीन तंत्रज्ञान आणि AI वापरून मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या गर्दीचं आकलन केलं जाईल. दर्शनासाठी रांगेत किती भक्त आहेत, याचा अंदाज घेता येईल.

AI temple india
Tuljapur temple: नवरात्रौत्सव! तुळजापूर मंदिर परिसरात एआय (AI) प्रणालीच्या आधारे गर्दीचे नियंत्रण, ६ कॅमेरे करणार मदत

AI कंट्रोल सेंटरची वैशिष्ट्ये

  • वैकुंठम-१ : कॉम्प्लेक्समध्ये हे इंटीग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर तयार करण्यात आलं आहे. इथे एका मोठ्या डिजिटल स्क्रीनवर मंदिराच्या परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचं लाइव्ह फुटेज पाहता येणार आहे.

  • चेहरा ओळखण्याची क्षमता: या सिस्टीममधील AI-सज्ज कॅमेऱ्यांमध्ये चेहरा ओळखण्याची (Face Recognition) क्षमता आहे.

  • वेळेचा अचूक अंदाज: हे कॅमेरे रांगेत उभ्या असलेल्या भाविकांची संख्या सहजपणे मोजू शकतात आणि दर्शनासाठी किती वेळ लागेल याचा अचूक अंदाज देऊ शकतात. यामुळे अधिकाऱ्यांसाठी गर्दीचं नियंत्रण करणं सोपं होईल.

  • 3D नकाशे आणि विश्लेषण: ही AI सिस्टीम जमिनीवरील परिस्थिती दर्शवणारे 3D नकाशे तयार करते. तसेच, कोणत्या भागात जास्त गर्दी आहे हे ओळखून गर्दी कमी करण्याचे उपायही सुचवते. वेगवेगळ्या स्रोतांकडून आलेल्या डेटाचं विश्लेषण करून कोणत्यावेळी मंदिरात जास्त गर्दी होईल, हेदेखील AI सांगू शकतं. यामुळे तिरुमला तिरुपति देवस्थानम् (TTD) आपल्याकडील साधनांचं अधिक चांगलं वाटप करू शकेल आणि दर्शनाच्या वेळेत सुधारणा करू शकेल.

AI temple india
‌Shirdi AI People Counting: ‘एआय‌’ सांगणार भाविकांचा आकडा; शिर्डी संस्थानात पिपल काऊंटिंगचा शुभारंभ

सुरक्षा आणि मदतीसाठीही AI

  • नवीन सिस्टीममुळे मंदिराच्या सुरक्षेतही वाढ होईल.

  • मंदिरातील चोरांना ओळखणं: चोरी किंवा इतर गैरकृत्यांमध्ये सामील असलेल्या लोकांना ओळखण्यासाठी ही सिस्टीम मदत करेल.

  • हरवलेल्या व्यक्तिंना ट्रॅक करणं: हरवलेल्या लोकांना शोधण्यासाठी (ट्रॅक करण्यासाठी) देखील AI चा उपयोग होईल.

  • भाविकांच्या अडचण असल्यास समजणं: AI भाविकांच्या चेहऱ्यावरील हावभावांचं विश्लेषण करून त्यांना काही अडचण आहे का, हे समजू शकेल. गरज पडल्यास मंदिर कर्मचाऱ्यांकडून त्वरित मदत मिळू शकेल.

  • आपत्कालीन परिस्थितीत मदत: जर कोणतीही आणीबाणी (Emergency) उद्भवली, तर AI भक्तांना बाहेर पडण्याचा सर्वात जवळचा मार्ग देखील दाखवेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news