AI & Fake News: 'फेक न्यूज'चे पेव अन् कंपनी झाली कंगाल; AIच्या वापरावर नियंत्रण कधी?

जगभरात बनावट बातम्या ही एक मोठी डोकेदुखी बनली आहे. AI च्या आगमनानंतर ही समस्या अधिक वाढली आहे.
AI & Fake News
AI & Fake News
Published on
Updated on

अमेरिकेतील एका सौर ऊर्जा (Solar) कंपनीला आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मुळे तयार झालेल्या एका खोट्या बातमीमुळे (Fake News) जवळपास 200 रुपये कोटींचे मोठे नुकसान झाले आहे आणि कंपनी पूर्णपणे बर्बाद होण्याच्या मार्गावर आहे. या घटनेमुळे बनावट बातम्यांचा धोका किती मोठा आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कंपनीच्या मालकाने आपल्या भविष्याबद्दल आणि ग्राहक विश्वासावर चिंता व्यक्त केली आहे.

जगभरातील वाढती समस्या

जगभरात बनावट बातम्या ही एक मोठी डोकेदुखी बनली आहे. AI च्या आगमनानंतर ही समस्या अधिक वाढली आहे. AI मुळे आता अगदी खऱ्याखुऱ्या वाटणाऱ्या व्हिडिओ आणि प्रतिमा (Images) बनवणे शक्य झाले आहे. याचा परिणाम म्हणून AI च्या माध्यमातून खोट्या बातम्या वेगाने पसरत आहेत. अमेरिकेतील एका सौर ऊर्जा कंपनीला अशाच एका बनावट बातमीमुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे.

AI & Fake News
Thane Crime News | इन्स्टाग्राम Fake ID आयडीवरून अश्लील फोटो पाठवला

काय आहे नेमकं प्रकरण?

न्यूयॉर्क टाइम्सच्या अहवालानुसार, मिनेसोटा येथील 'वुल्फ रिव्हर इलेक्ट्रिक' (Wolf River Electric) नावाच्या सौर ऊर्जा कंपनीला मागील वर्षी हा मोठा धक्का बसला. एका AI-निर्मित बातमीत असा खोटा दावा करण्यात आला होता की, कंपनीने सरकारच्या फसवणुकीच्या एका प्रकरणात समझोता केला आहे. या फेक न्यूजमुळे कंपनीचे 3 लाख 88 हजार डॉलर्सचे (भारतीय रुपयात अंदाजे 3.2 कोटी) मोठे करार रद्द झाले. याशिवाय, कंपनीची प्रतिष्ठा (Reputation) आणि विश्वासार्हता (Credibility) पूर्णपणे खराब झाली, ज्यामुळे कंपनीला 200 कोटींचा अंदाजित तोटा झाला. गेल्या दोन वर्षांत अमेरिकेत अशी किमान सहा प्रकरणे नोंदवली गेली आहेत, ज्यात AI टूल्सवर खोट्या आणि नुकसानकारक बातम्या पसरवण्याचा आरोप आहे.

Google वर मानहानीचा खटला

या सोलर कंपनीने Google कडून ही खोटी बातमी हटवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही. अखेरीस, कंपनीने Google विरुद्ध मानहानीचा (Defamation) खटला दाखल केला आहे आणि यात 900 कोटी रुपयांची भरपाई (Compensation) मागितली आहे. Googleने आपली चूक मान्य करत म्हटले की, नवीन तंत्रज्ञानामध्ये काही त्रुटी (Errors) असू शकतात आणि कळताच आम्ही त्यात सुधारणा केली. मात्र, सर्च रिझल्टमध्ये (Search Results) अजूनही कंपनीबद्दलची ती बनावट बातमी दिसत आहे, ज्यामुळे कंपनीच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे. कंपनीचे संस्थापक जस्टिन नील्सन (Justin Nielsen) म्हणतात, "वर्षानुवर्षांच्या मेहनतीने कमावलेली विश्वासार्हता एका खोट्या बातमीमुळे पूर्णपणे बर्बाद झाली आहे."

AI & Fake News
Fake Call Center Busted | अमेरिकेसह कॅनेडियन नागरिकांना लक्ष्य करणारे बनावट कॉल सेंटर उघडकीस

कंपनी बंद होण्याची भीती

जस्टिन नील्सन यांनी स्पष्टपणे धोक्याची घंटा वाजवली आहे. ते म्हणतात की, जर या बनावट बातम्यांवर नियंत्रण मिळवता आले नाही, तर त्यांची कंपनी बंद करावी लागेल (ताळे लावावे लागतील). ग्राहक आता कंपनीवर विश्वास ठेवत नाहीत आणि फेक न्यूजमुळे लोक कंपनीपासून दूर जात आहेत. नील्सन यांची मागणी आहे की, अशा बातम्या त्वरित हटवण्यात याव्यात.

जबाबदार कोण?

या प्रकारच्या घटनांमुळे कायदेशीर प्रश्न उभे राहत आहेत. AI द्वारे चुकीची माहिती पसरल्यास, कोणाला जबाबदार धरायचे?सिराक्यूज युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसर नीना ब्राउन म्हणतात की, AI च्या चुकांसाठी AI कंपन्यांना जबाबदार धरल्यास खटल्यांची संख्या वाढेल. अनेक तज्ज्ञांचे मत आहे की, फेक न्यूज रोखण्यासाठी नवीन कायदे आणण्याची गरज आहे आणि AI कंपन्यांनी अधिक सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा, अनेक लहान कंपन्या बंद पडू शकतात. सरकार आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी एकत्र येऊन या समस्येवर तोडगा काढणे महत्त्वाचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news