Airtel OTP Fraud Alert: मोबाईलमधील ओटीपीमुळे होणाऱ्या ऑनलाइन चोरीला आळा बसणार; एअरटेलने सुरु केली ‘फ्रॉड अलर्ट’ प्रणाली

Airtel OTP Fraud Alert: एअरटेलने ऑनलाइन ओटीपी फसवणूक रोखण्यासाठी ‘फ्रॉड अलर्ट’ ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित नवी प्रणाली सुरू केली आहे. ही यंत्रणा संशयास्पद कॉलदरम्यान बँकेचा ओटीपी आल्यास ग्राहकांना इशारा देते.
Airtel OTP Fraud Alert
Airtel OTP Fraud AlertPudhari
Published on
Updated on

Airtel’s New AI System to Protect Users from Online OTP Fraud:

ऑनलाइन फसवणूक, बनावट कॉल्स आणि ओटीपीच्या गैरवापरामुळे होणाऱ्या आर्थिक चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. अनेकदा पार्सल डिलिव्हरी आणि फूड ऑर्डरच्या नावाखाली सायबर भामटे ग्राहकांकडून ओटीपी मिळवतात आणि काही क्षणांत बँक खातं रिकामं करतात.

या गंभीर समस्येवर उपाय म्हणून Bharti Airtel ने ‘फ्रॉड अलर्ट’ ही कृत्रिम बुद्धिमत्तेवर (AI) आधारित नवी सुरक्षा प्रणाली सुरू केली आहे. ही यंत्रणा संशयास्पद कॉल आणि बँकेचे ओटीपी एकाच वेळी आल्यास ग्राहकांना सतर्क करते, त्यामुळे ऑनलाइन फसवणूक होण्याआधीच धोका टळू शकतो.

Q

एअरटेलची ‘फ्रॉड अलर्ट’ प्रणाली नेमकी काय आहे?

A

ही AI (Artificial Intelligence) वर आधारित सुरक्षा प्रणाली आहे. ग्राहकांच्या मोबाईलवर संशयास्पद कॉल सुरू असताना जर बँकेचा ओटीपी आला, तर ही प्रणाली लगेच अलर्ट देते आणि संभाव्य फसवणुकीबाबत सावध करते.

Q

ही यंत्रणा कशी काम करते?

A

ही प्रणाली थेट नेटवर्क स्तरावर काम करते. सायबर भामट्यांची हालचाल ओळखून ती:

– संशयास्पद व्यवहार शोधते

– ओटीपीचा गैरवापर होण्याआधी सूचना देते

– ग्राहकाला विचार करण्यासाठी वेळ देते

– फसवणूक होण्याआधीच हस्तक्षेप करते

म्हणजेच चोरी होण्याआधीच रोखण्याचा प्रयत्न करते.

Q

ओटीपीद्वारे फसवणूक कशी होते?

A

बहुतेक वेळा डिलिव्हरी बॉय, कुरिअर किंवा तातडीच्या सेवेच्या नावाखाली कॉल येतो. त्याच वेळी बँकेचा ओटीपी येतो. घाईत ग्राहक तो ओटीपी सांगतो आणि काही सेकंदांत पैसे गायब होतात नव्या एअरटेल प्रणालीमुळे अशा वेळी मोबाईलवर इशारा दिसतो.

Q

एअरटेलने हा निर्णय का घेतला?

A

एअरटेलचे एमडी आणि सीईओ शाश्वत शर्मा यांच्या मते, डिजिटल व्यवहार सुरक्षित ठेवणे हे एअरटेलचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ओटीपी ही सुरक्षा असली तरी त्याचाच गैरवापर वाढत असल्याचे लक्षात आल्यावर AI चा वापर करून ही नवी यंत्रणा विकसित करण्यात आली.

Q

ही सुविधा सध्या कुठे उपलब्ध आहे?

A

हरियाणा राज्यात ही सेवा आधीच सुरू झाली आहे. पुढील दोन आठवड्यांत देशभरातील सर्व एअरटेल ग्राहकांना ही सुविधा मिळणार आहे.

Q

याआधी एअरटेलने 'फ्रॉड' थांबवण्यासाठी कोणत्या सुविधा सुरु केल्या होत्या?

A

गेल्या दोन वर्षांत एअरटेलने:

– स्पॅम कॉल वॉर्निंग

– धोकादायक लिंक ब्लॉकिंग

– AI आधारित फ्रॉड डिटेक्शन

अशा अनेक सुविधा सुरू केल्या आहेत. ‘फ्रॉड अलर्ट’ हे त्याच सुविधेचे सर्वात प्रगत व्हर्जन मानले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news