

AI Success Story: जगभरात सध्या आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सची जोरदार चर्चा सुरू आहे. ते कसं मानवासाठी उपयुक्त आहे अन् AI कसे माणसांचे जॉब खाणार आहे या दोन्ही बाजूंनी याबाबत बोललं जात आहे. अशातच सोशल मीडियावर एका १९ वर्षाच्या भारतीय मुलाची प्रेरणादायी कहानी व्हायरल होत आहे. या १९ वर्षाच्या मुलाचं नाव आहे आयुष सिंह. या सोशल मीडिया पोस्टमध्ये आयुष हा आपल्या AI बिजनेसद्वारे महिन्याला १ कोटी रूपये कमवत आहे असा दावा केला जात आहे. अवघ्या १९ वर्षाच्या या मुलाची गोष्ट ऐकून अनेक लोक प्रेरित होत आहेत.
विशेष म्हणजे आयुषने कोणत्याही IIT किंवा MIT कॉलेजमधून शिक्षण घेतलेलं नाही. त्याने आपल्या कष्टाच्या जोरावर AI आणि मशिन लर्निंग शिकलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्याने फक्त १३ व्या वर्षी मशीन लर्निंग आणि AI बाबत शिकण्यास सुरूवात केली होती. या वयात अनेक मुलं व्हिडिओ गेम्स खेळणं पसंत करतात अन् आपले शालेय शिक्षण घेण्यातच बिझी असतात. त्यावेळी आयुषने नवे तंत्रज्ञान शिकले.
हळूहळू त्याच्याकडे AI बाबतची चांगली माहिती निर्माण झाली. त्यानंतर त्याने आपले हे ज्ञान दुसऱ्या लोकांपर्यंत पोहचवण्याचा निर्णय घेतला. आयुषने ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम सुरू केले. तिथं तो AI शिकणाऱ्या लोकांना शिकवत होता आणि त्यांना गाईड करत होता. या कोर्समध्ये लोक AI, मशीन लर्निंग आणि नवीन तंत्रज्ञानाशी संबंधित गोष्टी शिकतात.
मिळालेल्या माहितीनुसार आयुष सिंह हा आपले प्रोग्राम टॉपमेट प्लॅटफॉर्मवर विकतो. लॉकडाऊनदरम्यान, त्यानं AI बाबत गोष्टी समजून घेण्यास सुरूवात केली होती.
आयुषची ही भरारी पाहून सोशल मीडियावर लोकांच्या समिश्र प्रतिक्रिया आल्या आहेत. अनेक लोकांनी आयुषचा तुक्का लागला असं म्हणत स्कॅम असल्याची देखील शंका व्यक्त केली आहे. काही युजर्सनी याच्या AI कोर्सेसमध्ये कोणता दम नाही. AI कडून कोर्सेस तयार करून ते विकले जात आहेत असा दावा देखील काही जणांनी केला आहे.
या आयुषचा उत्पन्नाचा स्त्रोत हा हे कोर्सच आहे. मोठ्या संख्येने लोकं या प्रोग्राममध्ये सामील होतात. ते AI शिकण्यासाठी त्याला फी देतात. त्यामुळं त्याची कमाई करोडो रूपयांपर्यंत पोहचली आहे. सोशल मीडियावर अनेक लोकं त्याच्या यशाचे कौतुक देखील करत आहेत.