

पुढारी ऑनलाईन डेस्क : Post Office Monthly Income Scheme : तुम्ही सुरक्षित आणि स्थिर उत्पन्नाचा स्रोत शोधत आहात जो तुम्हाला दरमहा पैसे देईल? पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना (POMIS) तुमच्यासाठी योग्य पर्याय असू शकते. आकर्षक व्याजदर आणि सरकारी पाठिंब्यामुळे ही आर्थिक स्थिरतेचे गुरुकिल्ली ठरू शकते. ही योजना तुमच्या बचतीला मासिक उत्पन्नाच्या स्त्रोतामध्ये कसे बदलू शकते जाणून घ्या सविस्तर...
प्रत्येकजण आपल्या कमाईतील काही पैसे गुंतवण्याची योजना बनवत असतो. कारण भविष्यात मोठा निधी मिळू शकेल. या संदर्भात पोस्ट ऑफिस बचत योजना खूप लोकप्रिय आहेत. यामध्ये समाविष्ट असलेली पोस्टाची मासिक उत्पन्न (Post Office National Savings) योजना (MIS) ही एक लहान बचत योजना आहे. जी तुम्हाला स्थिर व्याज दर आणि मासिक उत्पन्न देते.
Post Office National Savings या योजनेत पैसे सुरक्षित राहतातच शिवाय व्याजही बँकांपेक्षा जास्त आहे. जर तुम्हाला ५ वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल, तर ही एक फायदेशीर योजना ठरू शकते. पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजनेमध्ये तुम्ही एका खात्याद्वारे किमान १ हजार आणि कमाल ९ लाख रूपये गुंतवू शकता. जर तुम्ही संयुक्त खाते उघडले तर त्यात गुंतवणूकीची कमाल मर्यादा १५ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. म्हणजेच पती-पत्नी दोघे मिळून १५ लाख रुपयांपर्यंत जमा करू शकतात. एका संयुक्त खात्यात जास्तीत जास्त तीन लोक गुंतवणूक करू शकतात. ७.४ टक्के व्याजदर मिळणार आहे.
मासिक उत्पन्न = ठेव रक्कम × व्याज दर/१२
५ लाख रूपयांच्या ठेवीसाठी - ३,०८३.३३ रूपये प्रति महिना मासिक उत्पन्न
९ लाख रूपयांच्या ठेवीसाठी - ५,५५० रूपये प्रति महिना मासिक उत्पन्न
१५ लाख रूपयांच्या ठेवीसाठी - ९,२५० रूपये प्रति महिना मासिक उत्पन्न
हे परतावे गुंतवणुकीच्या ५ वर्षांच्या कालावधीसाठी निश्चित केले आहेत.
खाते उघडल्याच्या तारखेपासून एक महिना पूर्ण झाल्यावर आणि परिपक्वतेपर्यंत व्याज देय असेल.
ठेवीच्या तारखेपासून १ वर्षाची मुदत संपण्यापूर्वी कोणतीही ठेव काढली जाणार नाही.
खाते उघडण्याच्या तारखेपासून १ वर्षानंतर आणि ३ वर्षापूर्वी खाते बंद केले असल्यास मुद्दलमधून २ टक्के इतकी वजावट रक्कम वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम दिली जाईल.
खाते ३ वर्षांनंतर आणि खाते उघडण्याच्या तारखेपासून ५ वर्षापूर्वी बंद झाल्यास मुद्दलमधून १ टक्के इतकी वजावट वजा केली जाईल आणि उर्वरित रक्कम दिली जाईल.
संबंधित पोस्ट ऑफिसमध्ये पासबुकसह विहित अर्ज सादर करून खाते उघडण्याच्या तारखेपासून ५ वर्षांच्या समाप्तीनंतर खाते बंद केले जाऊ शकते.
मॅच्युरिटीपूर्वी खातेदाराचा मृत्यू झाल्यास खाते बंद केले जाऊ शकते आणि रक्कम नामनिर्देशित व्यक्ती/कायदेशीर वारसांना परत केली जाईल.