Parents Guide : मुलांचे ४५ सेकंदात अपहरण होऊ शकते! सुरक्षित राहण्यासाठी त्यांना शिकवा 'हे' ५ सुरक्षा नियम

मुलाला सुरक्षित ठेवायचे असेल तर त्याला नक्की शिकवा ५ सेफ्टी रूल्स
Parents Guide
Parents Guide : मुलांचे ४५ सेकंदात अपहरण होऊ शकते! सुरक्षित राहण्यासाठी त्यांना शिकवा 'हे' ५ सुरक्षा नियम file photo
Published on: 
Updated on: 

parents guide parents should teach 5 safety rules safe children when go outside

पुढारी ऑनलाईन : मुलाची सुरक्षा हवी असेल तर या ५ सेफ्टी रूल्सची माहिती नक्की ठेवा. काही गोष्टी मुलांना शिकवा आणि काही गोष्टी स्वतःही शिका. कोणत्याही सराईत गुन्हेगाराला मुलाचे अपहरण करण्यासाठी काही सेकंद पुरेसे असतात आणि हे नियम तुमच्या मुलाला सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकतात.

Parents Guide
LPG Price Today : एलपीजी सिलेंडर बुक करतांय? जाणून घ्या प्रमुख शहरातील दर..

एखाद्या मुलाचे अपहरण करणे बदमाश आणि सराईत लोकांसाठी काही सेकंदांचा खेळ असतो. जराशी चूक झाली तर एका मुलासोबत संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होऊ शकते. पण तुमची थोडीशी सजगता तुमच्या मुलाला नेहमी सुरक्षित ठेवू शकते.

जसे तुम्ही तुमच्या मुलाला चांगले संस्कार शिकवता, वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला शिकवता, त्याचप्रमाणे मुलाला सुरक्षित कसे राहायचे याबद्दलही नक्की शिकवा.

मुले मोठी होऊ लागतात तेव्हा त्यांना शाळेत पाठवण्यासोबतच पार्कमध्ये, सोसायटीमध्ये खेळायला पाठवले जाते. तसेच ती स्वतःहून आजूबाजूच्या ठिकाणांचा शोध घेत असतात. अशा वेळी या मोठ्या होणाऱ्या मुलांना या ५ गोष्टी शिकवल्या तर त्यांच्या सुरक्षिततेची शक्यता वाढते.

Parents Guide
जेलमधून 17 कैदी कसे पळाले? मुख्यमंत्री विजय थलपती यांची कारवाई; 17 कर्मचारी निलंबित

मुलांच्या सुरक्षिततेसाठी हे ५ नियम नक्की माहीत असले पाहिजेत.

फोटो रूल्स

दर आठवड्याला आपल्या मुलाचा एक फोटो नक्की काढा. मुले दररोज मोठी होत असतात आणि त्यांच्या दिसण्यातही बदल होत असतात. मुलाची उंची किती आहे, शरीरावर एखादी नवीन खुण आहे का, मुलाने कोणते कपडे घातले आहेत, या सर्व गोष्टी फोटोमध्ये दिसून येतात. दुर्दैवाने मूल हरवले आणि फोटो सहा महिन्यांपूर्वीचा असेल, तर पोलीस अशा मुलाचा शोध घेतात, जे आता त्या जुन्या फोटोसारखे दिसतही नसते. त्यामुळे प्रत्येक पालकाने फोटो रूल्सचे पालन केले पाहिजे.

फसवून घेऊन जाणाऱ्या काका किंवा काकूपासून दूर राहा

मुलांना नक्की शिकवा की, वेगवेगळ्या गोष्टी सांगून जवळ येणाऱ्या काका किंवा काकूंपासून दूर राहायचे. मुलाला नेहमी समजावून सांगा की, खरे मोठे लोक कधीही लहान मुलांकडे मदत मागत नाहीत. एखादे काका-काकू किंवा कोणतीही वयस्कर व्यक्ती म्हणाली की, माझे पिल्लू किंवा मांजर शोधायला मदत कर, माझे सामान गाडीपर्यंत पोहोचव, चल तुला चॉकलेट घेऊन देते किंवा तुझ्या आईने बोलावले आहे, चल मी तुला घेऊन जाते, तर अशा लोकांपासून दूर राहावे. खऱ्या मोठ्या व्यक्तींना मदतीची गरज असेल तर त्या आपल्या वयाच्या किंवा त्यांच्यापेक्षा मोठ्या व्यक्तींकडे मदत मागतात. लहान मुलांकडे मदत मागितली जात नाही.

बाथरूम रूल

सार्वजनिक ठिकाणी असलेल्या बाथरूममध्ये मुलाला कधीही एकटे सोडू नका. बाथरूमच्या आसपास कॅमेरे नसतात आणि तिथे लक्ष ठेवणारेही कोणी नसते. अशा वेळी मुलाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो. सराईत लोकांना फक्त काही सेकंदांची गरज असते, जेव्हा मुलाच्या आसपास कोणीही नसते आणि त्याच्यावर लक्ष ठेवणारेही कोणी नसते.

ओरडण्याची योग्य पद्धत

मुलाला मदत कशी मागायची आणि योग्य पद्धतीने कसे ओरडायचे हे नक्की शिकवा. मुलाला 'हेल्प-हेल्प' किंवा 'वाचवा-वाचवा' असे ओरडायला शिकवू नका. त्याऐवजी त्याला 'हे माझे आई-बाबा नाहीत' असे मोठ्याने ओरडायला शिकवा. जेव्हा मूल अशा प्रकारे ओरडते, तेव्हा आजूबाजूचे लोक केवळ तमाशा न पाहता मदतीसाठी पुढे येतात.

मुलाला बाहेर पडण्याचा रस्ता दाखवा

मुलासोबत बाहेर जात असाल, मग ते थिएटर असो, मॉल असो किंवा जत्रा असो, त्याला बाहेर पडण्याचा रस्ता नक्की दाखवा. तसेच समजावून सांगा की, जर आपण एकमेकांपासून हरवलो किंवा वेगळे झालो, तर बाहेर पडण्याच्या ठिकाणी जाऊन थांबायचे. तसेच मुलांसोबत असलेल्या एखाद्या महिलेकडे मदत मागायची आणि तिला सांगायचे की, मी माझ्या आई-बाबांपासून हरवलो आहे. मुलांसोबत असलेली आई त्या मुलाला एकटे सोडणार नाही आणि त्याला मदत करेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.