Parenting Tips : भारतीय पालकांची एक चूक ठरतेय धोक्याची! मुले आई-वडिलांपासून होत आहेत दूर..

आई-वडिलांपासून दुरावत आहेत मुले! काय तुमीही करत आहात ही चूक?
Parenting Tips
Parenting Tips : भारतीय पालकांची एक चूक ठरतेय धोक्याची! मुले आई-वडिलांपासून होत आहेत दूर.. file photo
Published on
Updated on

parenting tips indian parents phone use impact on kids health study how to manage screen time

पुढारी ऑनलाईन : तुम्हाला माहिती आहे का, तुमचा वारंवार मोबाईल तपासण्याचा स्वभाव तुमच्या मुलांच्या मानसिक आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो? एका नव्या संशोधनानुसार, पालकांचा वाढलेला स्क्रीन टाइम मुलांमध्ये 'असुरक्षित भावनिक जडणघडण' (Insecure Attachment) निर्माण करू शकतो.

Parenting Tips
Child Brain : पालकत्व किंवा IQ नव्‍हे, मुलांच्या मेंदूच्‍या विकासावर होतो 'या' गोष्टीचा मोठा परिणाम! नवीन रिसर्च काय सांगतो?

आजच्या काळात स्मार्टफोन हा आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमच्या मोबाईलच्या वापराचा मुलांवर काय परिणाम होतो? नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असे समोर आले आहे की, जर पालक सतत फोनमध्ये व्यस्त असतील, तर त्याचा थेट परिणाम मुलांच्या वागणुकीवर आणि पालकांशी असलेल्या भावनिक नात्यावर होतो.

संशोधकांच्या मते, जेव्हा मुलांना असे वाटते की आई-वडील त्यांच्यापेक्षा मोबाईलकडे अधिक लक्ष देतात, तेव्हा मोठे झाल्यावर त्यांच्यामध्ये 'असुरक्षित भावनिक जडणघडण' (Insecure Attachment) विकसित होण्याची शक्यता वाढते. म्हणजेच, त्यांना पालकांशी घट्ट भावनिक नाते निर्माण करण्यात अडचणी येऊ शकतात.

Parenting Tips
Child Education Tips | शिक्षण : ओझ्याकडून गोडीकडे...

मोबाईलच्या व्यसनामुळे मुलांशी वाढतो भावनिक दुरावा

'फ्रंटियर्स इन सायकॉलॉजी' या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या अभ्यासात 12 ते 17 वयोगटातील सुमारे 600 किशोरवयीन मुलांचा सहभाग होता. यासाठी डिव्हाइस अटॅचमेंट इंटरफेरन्स स्केल (DAIS) चा वापर करण्यात आला.

अभ्यासात असे दिसून आले की, ज्या मुलांना वाटते की त्यांचे पालक त्यांच्यापेक्षा मोबाईलला अधिक महत्त्व देतात, ती मुले भावनिकदृष्ट्या अधिक अस्वस्थ असतात. त्यांना अनेकदा दुर्लक्षित केल्याची भावना निर्माण होते, ज्यामुळे पालक-मुलांचे नाते कमकुवत होऊ शकते.

'असुरक्षित भावनिक जडणघडण' म्हणजे काय?

या संशोधनात दोन प्रकारच्या भावनिक स्थितींचा उल्लेख करण्यात आला आहे.

चिंताग्रस्त (Anxious): या प्रकारात मुलं सतत पालकांचे लक्ष आणि प्रेम मिळवण्यासाठी धडपडत राहतात.

दुरावा ठेवणारी (Avoidant): या प्रकारात मुलं हळूहळू पालकांपासून भावनिक अंतर ठेवू लागतात आणि स्वतःला दूर करू लागतात.

संशोधकांच्या मते, मोबाईलच्या अतिवापरात अडकलेल्या पालकांच्या मुलांमध्ये या दोन्ही प्रकारच्या समस्या अधिक प्रमाणात आढळतात. मात्र, तज्ज्ञांचे असेही मत आहे की, केवळ मोबाईलचा वापरच यासाठी जबाबदार आहे असे नाही. आधीपासूनच भावनिकदृष्ट्या असुरक्षित असलेली मुलेही पालकांच्या मोबाईल वापरामुळे अधिक चिडचिड करू शकतात.

डिजिटल युगातील पालकत्वाची मोठी कसोटी

मीडिया सायकॉलॉजिस्ट डॉन ग्रँट यांच्या मते, सोशल मीडिया आणि विविध अॅप्स अशा पद्धतीने तयार केले जातात की ते पालकांनाही सतत त्यांच्याकडे आकर्षित ठेवतात. त्यामुळे पालकही या सवयीपासून सहज सुटू शकत नाहीत.

या संशोधनाचा उद्देश पालकांनी मोबाईल पूर्णपणे बंद करावा, असा नाही. मात्र, हा अभ्यास एक इशारा देतो की पालकांनी आपल्या मोबाईलच्या वापरात आणि मुलांसोबत घालवलेल्या दर्जेदार वेळेत योग्य संतुलन राखणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा, डिजिटल जगात मुलांकडे दुर्लक्ष केल्याचा त्यांच्या भविष्यातील मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news