Tata Tiago EV Booking : 1100 रूपयांत 1000 किलोमीटर धावणार टाटाची ‘ही’ नवी कार; बुकिंग सुरू

Tata Tiago EV Booking : 1100 रूपयांत 1000 किलोमीटर धावणार टाटाची ‘ही’ नवी कार; बुकिंग सुरू
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Tata Tiago EV Booking : टाटा मोटर्सने टियागो ईवीच्या मायलेजशी संबंधित एक मोठा दावा केला आहे. कंपनीने दिलेल्या माहिती नूसार ही कार पेट्रोलच्या तुलनेत एक किलोमीटरला 6.5 रूपयांची बचत करेल. सर्वात स्वस्त आणि कमी खर्च असणारी ही कार असणार आहे. टाटा मोटर्सची टियागो ईवी ही तीसरी इलेक्ट्रिक कार आहे. या कंपनीचे सोमवारपासून (10, ऑक्टो) बुकींग सुरू झाले आहे.

टाटा मोटर्सची (Tata Motors) सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टियागो ईवीचे (Tiago EV) बुकींग 10 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे असे सांगण्यात आले होते. कंपनीने या कारशी संबंधित अनेक दावे केलेले आहेत. देशात इलेक्ट्रिक गाड्यांची वाढती मागणी पाहता टाटाने या प्रकारावर अधिक जास्त काम करण्यास सुरूवात केली आहे. नेक्सन ईव्ही आणि टिगोर या टाटाच्या बाजारातील प्रसिद्ध कार आहेत.

कंपनीने दिलेल्या माहितीनूसार, या रेंजची कोणतीही कार चालवत इसताना 1000 किलोमीटरला 7500 रूपयांचे पेट्रोल लागेल. पण 1100 रूपयांमध्ये 1000 किलोमीटर इतके मायलेज ही टियागो ईव्ही कार देईल. त्यामुळे पेट्रोलवर जवळपास 6500 रूपयांची बचत झाली आहे.

10 ऑक्टोबरपासून बुकिंग सुरू

टियागो ईव्हीचे बुकिंग 21000 रूपयांची टोकन रक्कम देऊन बुकिंग करता येईल. या कारची विक्री 2023 पासून सुरू होईल असे सांगण्यात आले आहे. Ziptron टेक्नॉलॉजीवर आधारित ही टियागो ईव्ही कार असणार आहे. किंमतीबाबत बोलायचे तर, 8.49 लाख ते 11.79 लाख रूपये इतकी रेंज याची असणार आहे.

कशी असणार आहे ही कार?

IP67 rated battery pack आणि 24kWh Battery Pack सह अनेक चार्जिंग पर्यायांसह कार सुसज्ज असेल. तसेच कंपनीने मोटर आणि बॅटरी याला 8 वर्ष किंवा 1,60,000 किलोमीटर इतकी वॉरंटी दिलेली आहे. या कारची बॅटरी 57 मिनीटांमध्ये 80% चार्ज होईल. तसेच यामध्ये हिल स्टार्ट, डिसेंट असिस्ट, टीपीएमएस, ऑटोमॅटिक क्लाईमेट कंट्रोल मल्टी मोड या फिचर्स यामध्ये असणार आहेत.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news