

बटाटे, कांदा, दही, ओलं खोबरं, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ.
साधारण मध्यम आकाराचे दोन-तीन बटाटे व्यवस्थित उकडून घ्या. हिरवी मिरची आणि कोथिंबीर छान बारीक चिरून घ्या. एक कांदा जरा जाडसर चिरून घ्या. उकडलेले बटाटे गार झाल्यावर हाताने कुस्करून घ्या. त्यात कांदा, मिरची घाला आणि नीट एकत्र करून घ्या. आता मीठ, दही, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घाला. हे मिश्रण चमच्याने व्यवस्थित ढवळलं की झालं बटाट्याचं झटपट भरीत तयार!