

बोनलेस चिकन, क्रीम किंवा साय, दही, तळलेल्या कांद्याचा चुरा, मिरच्या, वेलदोडे, काळी मिरी, गरम मसाला, कसुरी मेथी, आलं, लसूण, कोथिंबीर, मीठ.
सगळ्यात आधी बोनलेस चिकनचे मध्यम आकाराचे तुकडे धुऊन घ्या आणि बाजूला ठेवा. दुसरीकडे हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर वाटून घ्या. एका वाटीत ही वाटलेली हिरवी चटणी, क्रीम, दही नीट एकत्र करून घ्या. आता कढईत बटर किंवा तेल घालून गरम करा आणि त्यात चमचाभर आलं लसूण पेस्ट घालून परतून घ्या.
मग त्यात धुऊन ठेवलेलं चिकन, मीठ, तळलेल्या कांद्याचा चुरा, मिरपूड, बारीक केलेले वेलदोडे, गरम मसाला असं सगळं घालून एकत्र करून नीट परतून घ्या. हे चिकन शिजल्यावर आधी करून वाटीत काढून ठेवलेली मलई पेस्ट त्यात घाला. गरजेनुसार थोडं पाणी घालून झाकण ठेवून छान उकळी येऊ द्या. तेल सुटायला लागलं की वेलदोड्याची पावडर आणि कसुरी मेथी चुरून वरुन भुरभुरवा. तयार मलई चिकन चपाती, ब्रेड, किंवा भातासोबत खायला घ्या.