आनंददायी ‘हिरवाई’ | पुढारी

आनंददायी ‘हिरवाई’

मृणाल सावंत

आपले घर एक प्रकारचे मंदिर असते. त्यात आपण आपल्या कुटुंबासोबत राहत असतो. घरातील सदस्य एकमेकांच्या सुख-दु:खात सहभागी होत असतात. घरातील सदस्यांमधील प्रेमाची, आपुलकीची साक्ष देत असतात. सणावाराला विशेषत: दिवाळीला रंगांनी आपण घर सजवत असतो. निसर्गाने तयार केलेल्या प्रत्येक रंगाला वेगळे महत्त्व आहे. हिरवा रंग हा समृद्धीचे प्रतीक मानले जाते. घराला हिरवा रंग दिल्यास आनंददायी आणि प्रसन्न वातावरण निर्माण होते.

हिरव्या रंगाचे काही फायदे

हिरवा रंग हा कुठल्याही रंगासोबत मॅच होतो. हिरव्या रंगासोबत तुम्ही पिवळा, निळा किंवा पांढरा रंगाची बेडसीट किंवा पिलो कव्हर घ्याला हरकत नाही. तसेच फिकट हिरव्या रंगाचे पडदेही छान दिसतात.

बाजारात हिरव्या रंगाचे फर्निचर व गालीचे उपलब्ध असतात. त्यांचा वापर करून तुमच्या खोलीला एक वेगळाच लूक देऊ शकता.
हिरवा रंग डोळ्यांसाठी उत्तम आहे. हा रंग आपल्या मनालाही प्रसन्न करतो. म्हणूनच घराच्या सजावटीत हिरव्या रंगांचा वापर जास्तीत जास्त करायला काही हरकत नाही.

संबंधित बातम्या

हिरव्या रंगाचा टेबल क्लॉथ, फुलदाणी गडद हिरव्या रंगाची असल्याने दिवाणखान्यात प्रसन्नता निर्माण होत असते. दिवाणखान्यात एक मोठे पोस्टर लावावे, ज्यात धबधबा आणि हिरवाई दाखवणारे चित्र असेल.घरातील कोपरा मोठ्या अशा पाम वृक्षाने किंवा अन्य आर्टिफिशियल वृक्षांनी, वेलींनी सजवा. नेहमी निसर्गाच्या सान्निध्यात असण्याचा भास होईल.

Back to top button