Curry leaves : केस काळे, लांब, दाट होण्यासाठी कढीपत्‍याचा ‘असा’ उपयोग फायदेशीर ठरेल | पुढारी

Curry leaves : केस काळे, लांब, दाट होण्यासाठी कढीपत्‍याचा 'असा' उपयोग फायदेशीर ठरेल

मेघना ठक्कर

कढीपत्त्यांमध्ये व्हिटॅमिन बी 1, बी 3, बी 9 आणि सी असते. त्याशिवाय यात आयर्न, कॅल्शियम आणि फॉस्फरस असते. याचे सेवन रोज केल्याने तुमचे केस काळे लांब आणि दाट होऊ लागतात. कढी पत्त्याचे तेल तयार करून ते केसांसाठी फायदेशीर ठरते.

यासाठी कढीपत्त्याचा एक जुडी घेऊन त्याला स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावे. ही जुडी सूर्यप्रकाशात वाळवून घ्यावी. जेव्हा ही पाने वाळवून तयार होतील मग याची पूड करून घ्यावी. आता 200 एमएल नारळाचे किंवा ऑलिव्ह ऑईलमध्ये किमान 4 ते 5 चमचे कढीपत्त्याच्या पानांची पूड मिक्स करून उकळत ठेवावे. दोन मिनिटांनंतर गॅस बंद करून द्यावा. तेल गाळून एखाद्या एअरटाईट बाटलीत भरून ठेवा.

झोपण्याअगोदर रोज रात्री हे तेल लावल्याने केसांना फायदा होतो. जर हे तेल थोडे गरम करून लावले तर त्याचे परिणाम लवकरच दिसून येतील. दुसर्‍या दिवशी सकाळी डोक्याला फक्त नॅचरल शॅम्पू लावून धुवावे. या ट्रिटमेंटला तुम्ही रोज किंवा एक दिवसाआड करू शकता. तुम्हाला नक्कीच फायदा मिळेल.

केसांसाठी दुसरा उपाय म्हणजे मास्क. कढीपत्त्याची पाने बारीक करून पेस्ट बनवा. त्यात थोडं दही घालून केसांना लावा. आता केस 20—25 मिनिटे तसेच ठेवा. नंतर शॅम्पूने केस धुवा. असे नेहमी केल्याने केस काळे आणि घनदाट होतात. कढीपत्त्याचा चहादेखील केसांना निरोगी ठेवणारा ठरतो. कढीपत्ता पाण्यात उकळून घ्या. नंतर त्यात लिंबू पिळा आणि साखर घाला. असा चहा बनून एक आठवडा प्यावा. हा चहा आपल्या केसांना लांब, घनदाट बनवेलच, शिवाय केस पांढरे होण्यापासूनही वाचवेल, तसेच महत्त्वाचे म्हणजे या चहाने पचनक्रियाही उत्तम राहते.

Back to top button