लग्न समारंभामध्ये हल्ली लेहंगा चोली घालण्याची फॅशन रूढ झाली आहे. लेहंगा चोली थोडा आधुनिक लूक देतेच, पण पारंपरिक पेहराव म्हणूनही पाहता येते. बारीक चणीच्या तरुणींना लेहंगा जितका छान दिसतो तितकाच स्थूल अंगाच्या तरुणींना तो विचित्र दिसतो. त्यामुळे प्लस साईज म्हणजे स्थूल तरुणींनी काही गोष्टी लक्षात ठेवून लेहंगा निवडावा. त्यामुळे आपले व्यक्तिमत्त्व चांगले दिसेल आणि आकर्षक लूक (Lehenga choli) मिळेल.
प्लस साईजच्या महिलांनी लेहंग्यासाठी शिफॉन, जॉर्जेट किंवा नेटचे कापड निवडावे. या कापडांमध्ये स्थूल व्यक्ती बारीक दिसू शकते. स्थूल व्यक्तींनी स्टिफ फॅब्रिक वापरू नये. प्लस साईज महिलांना कळीचा, ए-लाईन किंवा फिश कट लेहंगा चांगला दिसतो. त्यामुळे लेहंगा घेताना किंवा शिवताना त्याचा घेर कसा असावा याकडे जरूर लक्ष (Lehenga choli) द्यावे.
बारीक दिसण्यासाठी पातळ किनार असलेला लेहंगा निवडा. कारण मोठ्या किनारीच्या लेहंग्यामुळे आपण अधिक जाड दिसू शकता. आधुनिक लूकसाठी ब्लाऊज किंवा चोली बरोबर काही प्रयोग करू नका. स्थूल व्यक्तींना पारंपरिक चोली चांगली दिसते. चोळी किंवा ब्लाऊजची लांबी खूप कमी किंवा खूप लांब नसावी. ब्लाऊज शिवून घेताना लेहंगा आणि चोली यांच्यामध्ये खूप अंतर राहू नये याची काळजी घ्या. हे अंतर अधिक असेल तर स्थूल व्यक्ती अधिक स्थूल दिसू शकते. स्थूल व्यक्तींवर लहान लहान मोटिफ असलेली रंगछटांचा वापर करून केलेली कलाकुसर चांगली दिसते. त्याशिवाय सीक्वेन्स, बीडस्, तसेच अँटिक सोनेरी कलाकुसरही आपल्यावर चांगली दिसू शकते. मात्र, खूप जास्त कलाकुसर असलेला लेहंगा वापरू नका. नाहीतर आपला प्लस साईज झाकता (Lehenga choli) येणार नाही.