Kasturi : दर्पण माझा वेगळा | पुढारी

Kasturi : दर्पण माझा वेगळा

Kasturi : आरशाशिवाय घर ही कल्पनाच आपण करू शकत नाही. घरातील आरशावर डाग पडले असतील तर तो दिसायला वाईट दिसतोच; पण त्यामध्ये चेहरा पाहण्याचीही इच्छा होत नाही. त्यासाठी आरसा सफाईचे तंत्र समजून घेणे आवश्यक आहे.

घरामध्ये आरशाचे एक वेगळेच महत्त्व असते. तो नसेल तर घराला एक प्रकारचे अधुरेपण येईल. त्यामुळे आरशाला नेहमी स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे. डाग पडून खराब झालेले आरसे पहायला तर नकोच वाटतात; पण त्यामध्ये चेहरा पाहण्याचीही इच्छा होत नाही. आपल्या घरातील आरसा चमकदार हवा असेल तर काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

आरशाची सफाई करताना सर्वात आधी आरशावर लावण्यात आलेला स्टीकर किंवा लेबल नेल पॉलिश रिमूव्हवर आणि परफ्यूमचा वापर करून साफ केला पाहिजे. आरशावर कपाळाची टिकली वगैरे लावू नये. त्यामुळे आरशाला डाग पडून तो खराब दिसतो. आपण घाईत असाल तर आरशावर जमलेली धूळ आणि घाण टिश्यू पेपरने ही साफ करू शकता.

गरम पाण्यामध्ये साबण मिसळावा आणि स्थाने आरसा साफ करावा. आरशावर एखादा चिकट पदार्थ चिकटला. आहे, असे तुमच्या लक्षात आले तर शेव्हिंग फोम आणि टूथ ब्रशने घासून ती जागा साफ करता येईल. आपल्या आरशाला एखाद्या ठिकाणी तडा गेला असेल तर त्या ठिकाणी टॅल्कम पावडर टाकून तो लपवता येईल; पण ती जागा पाण्याने धुवू नका. याशिवाय व्हिस्टिकचाही उपयोग करून स्क्रॅच गायब करता येईल. यासाठी स्क्रैचवर फेल्टिस्टिक लावा आणि त्वरित ती जागा पुसून घ्या आपला आरसा नेहमी चमकदार राहावा, असे वाटत असेल तर त्याची नियमित सफाई करणे आवश्यक आहे.

हेही वाचा : 

Back to top button