

फॅशनचे ट्रेंड दर दिवशी बदलत असतात. त्यातीलच एक आहे कॅप्शन ज्वेलरी. मुलींना हल्ली कॅप्शन ज्वेलरी जास्त पसंत पडताना दिसते.
फॅशनचे जगात सातत्याने बदल होतात. डिझायनर कपडे असतात तसेच नवनवीन प्रकारची ज्वेलरीही असते. फॅशन आणि स्टाईल च्या नावावर विविध प्रयोग करण्यात मुली पटाईत असतात. त्यातील एक कॅप्शन ज्वेलरी. हल्ली कॅप्शन ज्वेलरीला अधिक पसंती दिली जाते.
स्टायलिश कॅप्शन ज्वेलरी- बाजारात हल्ली कॅप्शन ज्वेलरीची चलती आहे. विविध कॅप्शनने सजलेली ही ज्वेलरी स्टायलिश लूक देतेे. आर्टिफिशियल ज्वेलरी स्टोअर्समध्ये अँकलेट, ईअरकफ आणि रिंग्ज यामध्ये कॅप्शन ज्वेलरी मिळते. यामध्ये नखरेवाली, मुसाफिर, ख्वाबिदा आणि देखो मग प्यार से सारखे अनेक पर्याय लिहिलेले मिळतात. धातूमध्ये ही ज्वेलरी मिळते. या ज्वेलरीच्या कॅप्शनलाही स्टायलिश आणि डिझायनर लूक दिला आहे. बाजारात 450 रुपयांपासून याची सुुरुवात होते आहे. कॉईन नेकपीस आणि कानातले – चलनातून नाणी बाद झाली असली तरीही दागिन्यांमध्ये मात्र त्यांना किंमत आहे. पाच पैसे, एक रुपया आणि इंग्रजांच्या काळात तयार झालेली कानातल्यांच्या ट्रेंड आता परत आला आहे.
कानातल्याला रंगीत मोत्यांबरोबर नाण्यांचा हा लूक पहायला मिळतो तर गळ्यातील दागिन्यांमध्येही या नाण्यांचा सुरेख वापर केलेला दिसतो. या दागिन्यांमध्ये कानातले, गळ्यातला हार, ब—ेसलेट तसेच अंगठीही पहायला मिळते. त्यात 10 पैशांचे नाणे प्रामुख्याने वापरले जाते. अशा प्रकारच्या दागिन्यांची फॅशन यापूर्वीही होती. आता डिझायनर ज्वेलरीच्या स्वरूपात ती नव्याने बाजारात आलेली दिसते.
फेंगशुई ज्वेलरीचा युनिक लूक- फेंगशुई ज्वेलरीची सध्या फॅशन आहे. फेंगशुई ज्वेलरी स्टाईल बरोबर आत्मविश्वासही देते. त्यात गोल्ड प्लेटेड चेन आणि लाफिंग बुद्धा पेडंट सह इतरही काही डिझाईन्स आणि पॅटर्न ची ज्वेलरीची खूप मागणी आहे.