मेकअपमध्ये पावडरची गरज | पुढारी

मेकअपमध्ये पावडरची गरज

आज बदलत्या जीवनशैलीमध्ये मेकअपचे महत्त्व सर्वांनाच दिसू लागलेय. यामध्ये विविध क्रीमबरोबर पावडरचाही समावेश आहे. पावडरीचे अनेक उपयोग करता येतात.

उन्हाळ्यात तर चेहर्‍यावर पावडर लावणे सौंदर्याच्या द़ृष्टीने फायदेशीर असते. कारण त्या दिवसात घाम व घामोळ्या येण्याचे प्रमाण वाढते.
घामामुळे शरीराला खास सुटते. पावडर लावल्याने त्वचेवरील घाम सुकतो व गोरेपणाही येतो. मेकअप अधिक खुलवण्यासाठी कॉम्पॅक्ट पावडर वापरली जाते.

बहुतेक वेळा स्रिया कॉम्पॅक्ट पावडर हनुवटीवर लावण्यासाठी करतात.

संबंधित बातम्या

दुर्गंधीयुक्त घामापासून सुटका करून घेण्यासाठी प्रत्येकजण धडपड करतो. त्यासाठी सुगंधीयुक्त पावडरचा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो.

लूज फेस पावडर पारदर्शी असते. ती आपल्या मेकअपमध्ये मॅट फिनिशिंग देते. चेहर्‍यावर फौंडेशन लावल्यानंतर लूज फेस पावडर लावली जाते. आज बाजारात आपल्या बॉडी टोनला मॅच होणार्‍या रंगाच्या शेडस् मिळतात.

टाल्कम पावडरचा वापर शरीरावर घाम सुकवण्यासाठी केला जातो. त्यात विविध पदार्थांव्यतिरिक्त टेल्क खनिज काही प्रमाणात असते. बाजारात टाल्कम पावडर गुलाब, मोगरा, चंदन आदी फ्लेवरमध्ये उपलब्ध आहेत.

– मिथिला शौचे

Back to top button