Kasturi : मेंदीचे नवीन प्रकार, जाणून घ्या ट्रेंडी डिझायनर मेंदीबद्दल… | पुढारी

Kasturi : मेंदीचे नवीन प्रकार, जाणून घ्या ट्रेंडी डिझायनर मेंदीबद्दल...

पुढारी कस्तुरी : बदलणार्‍या काळात फॅशन बदलते आहे. मेंदीनेसुद्धा आपले रंग बदललेले आहेत. लग्नप्रसंगी किंवा कुठल्याही समारंभात मेंदी लावलेले हात सर्वांनाच आपल्याकडे आकर्षित करतात.

हल्ली स्त्रिया हातालाच नव्हे, तर पाठ, दंड यावरही मेंदी लावतात. डिझायनर ड्रेस व ज्वेलरीबरोबरच डिझायनर मेंदीचा ट्रेंड आहे. आपण पाहूया काही ट्रेंडी डिझायनर मेंदीबद्दल.

फँटसी स्टाईल मेंदी : फँटसी मेकअपबरोबर आता तशाच स्टाईलची मेंदी लोकप्रिय झाली आहे. यात ड्रेस व ज्वेलरीच्या रंगाशी मेळ खात असलेल्या रंगांनी मेंदीची डिझाईन केली जाते. या मेंदीत फँटसी मेकअपचा प्रयोग केला जातो. नंतर डिझाईनच्या अनुरूप रंगीबेरंगी खडे व कुंदनाचा प्रयोग करून सजवण्यात येते. ही मेंदी दिसायला सुंदर दिसते.

जरदौसी मेंदी : जरदौसी मेंदी सिल्व्हर किंवा गोल्डन शेडमध्ये असते. मेंदीने हातांवर सिल्व्हर किंवागोल्डन रंगाने डिझाईन बनवण्यात येते. ही मेंदी फारच सुरेख दिसते.

अरेबियन मेंदी : अरेबियन स्टाईलमध्ये जाड—जाड फुलापानांची डिझाईन बनवण्यात येते. अरेबियन मेंदीत आऊट लाईन काढून हिरव्या मेंदीने शेडिंग केली जाते. काळ्या व लाल रंगांच्या मेंदीवरसुद्धा तुम्ही ड्रेसच्या रंग व डिझाईनच्या अनुरूप रंगीबेरंगी खडे व कुंदन लावू शकता.

राजस्थानी किंवा मारवाडी मेंदी : राजस्थानी व मारवाडी मेंदीसुद्धा फॅशनमध्ये आहे. या स्टाईलच्या मेंदीने बाजूंवर कड्याच्या आकाराचे डिझाईन बनवू शकता.

Back to top button